HW News Marathi
देश / विदेश

काँग्रेसची स्वबळाची घोषणा, महाराष्ट्रासाठी राहुल गांधींचा ठरला ‘मास्टर प्लॅन’

नवी दिल्ली | राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या कुरबुरी सुरू असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक मोठी घोषणा केली आहे. राहुल गांधींची काल (२० जुलै) दिल्लीत भेट घेतल्यानंतर नाना पटोले यांनी पुन्हा एकदा स्वबळाची भाषा केली आहे. यावेळी कर्नाटकचे काँग्रेसचे एच.के.पाटील यांनीही राहुल गांधींची भेट घेतली होती. पक्षाच्या पुढील वाटचाली संदर्भात आणि रणनीती संदर्भात या भेटीत चर्चा झाली असं सांगितलं आहे.

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. पटोले यांनी गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी फोन टॅपिंगचे केल्याचे गंभीर आरोप केले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवरही जोरदार टीका केली होती. या टीकेनंतर शरद पवार यांनी काँग्रेसच्या राज्यातील आणि केंद्रीय नेत्यांकडे तक्रारही केली होती. स्वबळावर लढायचे असेल तर तशी घोषणा करा म्हणजे आम्हालाही मग तयारीला लागता येईल, या शब्दात शरद पवारांनी खडसावले होते. त्यानंतर नाना पटोले यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याची सारवासारव केली होती. पण आता पुन्हा एकदा पटोले यांनी स्वबळाची घोषणा केली होती.

महाराष्ट्रासाठी राहुल गांधींचा ‘मास्टर प्लॅन’

राहुल गांधी यांच्या भेटीविषयी बोलताना नाना पटोले यांनी सांगितले की, “महाराष्ट्तील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. काँग्रेसला महाराष्ट्रात नंबर एकचा पक्ष कऱण्याचे माझे स्वप्न आहे. राहुल गांधींनी महाराष्ट्रासाठी एक मास्टर प्लॅन तयार केला आहे, त्यानुसार काम केले जाणार आहे. काँग्रेसला सक्षण करण्यासाठी आम्ही सर्वकाही करु” असे नाना पटोले यांनी सांगितले आहे. पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत लढणार आहे, याविषयी विचारले असता, निवडणुकांना अजून 3 वर्ष आहेत, त्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे उत्तर नाना पटोले यांनी दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#MahatmaGandhi : जाणून घ्या… महात्मा गांधींविषयी दुर्मिळ माहिती

News Desk

गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय सहन करणाऱ्या लोकांना न्याय मिळेल !

News Desk

कृषी कायदा मागे रद्द करण्याबाबत मोदींची महत्त्वाची बैठक

News Desk