HW News Marathi
Covid-19

मोदीजी, आमच्या मुलांची व्हॅक्सिन परदेशात का पाठवली?, राहुल गांधी म्हणतात, मलाही अटक करा!

नवी दिल्ली | कोरोना व्हॅक्सिनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात दिल्लीत पोस्टर लावण्यात आले आहे. त्यामुळे 25 लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या लोकांना जामीनही मिळाला आहे. मात्र, या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर हे पोस्टरच शेअर केलं आहे. त्यात या दोघांनी मलाही अटक करा, असं म्हटलं आहे. तसेच मोदीजी, आमच्या मुलांची व्हॅक्सिन परदेशात का पाठवली? असं हिंदीत लिहिलेलं हे पोस्टर सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं असून अनेक काँगस नेत्यांनी हे फोटो ट्विट करत डीपी देखील ठेवले आहेत.

 

कोरोना लशींवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात दिल्लीत ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत २१ ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत. तर १७ जणांना अटक केली आहे. हाच मुद्दा पकडत आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मलाही अटक करा असं आव्हान करत पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये “मोदी जी, हमारे बच्चों की व्हॅक्सिन विदेश क्यों भेज दिया?” असा मजकूर आहे. तर राहुल गांधी यांनी आपला प्रोफाईल फोटोवरही पोस्टर ठेवलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना लशींचा तुटवडा जाणवत असून अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद आहेत. तर अनेक जण लसीकरण केंद्रावर जाऊनही लस मिळत नसल्याने हैराण आहे. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. दिल्लीत ठिकठिकाणी लागलेल्या पोस्टरमुळे राजकारण तापलं आहे.

काय आहे प्रकरण?

गुरुवारी रात्री पोलिसांना दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टर लावण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यावर मोदीजी, आमच्या मुलांची व्हॅक्सिन विदेशात का पाठवली? असं लिहिलं होतं. दिल्ली पूर्व, नार्थ ईस्ट, सेंट्रल, नॉर्थ, रोहिणी आणि द्वारका जिल्ह्यात हे पोस्टर लावलेले होते. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 25 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक संपत्तीचं नुकसान केल्याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 188 अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. तसेच हे पोस्टर कुणी लावले, कुणाच्या इशाऱ्यावरून लावले याचा शोध पोलीस घेत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज नव्या ५,३१८ कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

महाविकास आघाडी सरकार मिनिमम कॉमन हिंदुत्वावर ! ‘मनसे’चा टोला

News Desk

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सर्वेक्षण सुरु – मुरलीधर मोहोळ

swarit