HW News Marathi
महाराष्ट्र

विस्टाडोम कोचच्या सुरूवातीसह पुणे – मुंबई – पुणे प्रगती एक्स्प्रेस पूर्ववत

मुंबई | रेल्वे पुणे – मुंबई – पुणे प्रगती एक्स्प्रेसची सेवा पूर्ववत करेल आणि डब्यांचे एलएचबीमध्ये रूपांतर करून या ट्रेनमध्ये विस्टाडोम कोच सुरू करण्यात येत आहे. यानुसार, प्रगती एक्स्प्रेसमध्ये व्हिस्टाडोम कोच सुरू झाल्यानंतर मध्य रेल्वेकडे आता ४ गाड्या विस्टाडोम कोचसह धावणार आहेत. मुंबई – मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस, मुंबई – पुणे डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई – पुणे डेक्कन क्वीन आणि आता मुंबई – पुणे प्रगती एक्स्प्रेस या ४ गाड्या आहेत.

12125 एक्सप्रेस दि. २५.७.२०२२ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दररोज १६.२५ वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी १९.५० वाजता पोहोचेल. 12126 एक्सप्रेस दि. २५.७.२०२२ पासून दररोज ०७.५० वाजता पुणे येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे त्याच दिवशी ११.२५ वाजता पोहोचेल.

 

थांबे – दादर, ठाणे, पनवेल, कर्जत, लोणावळा, शिवाजी नगर (फक्त12125 साठी).

संरचना – एलएचबी कोच: एक विस्टाडोम कोच, एक वातानुकूलित चेअर कार, ११ द्वितीय श्रेणी चेअर कार (५ पूर्णपणे आरक्षित, ४ अनारक्षित, एक मासिक तिकीटधारकांसाठी आणि एक महिला कोच – महिला मासिक तिकीटधारकांसाठी ५४ जागा आणि महिलांसाठी ५४ राखीव जागा) आणि गार्डच्या ब्रेक व्हॅनसह एक सामान्य द्वितीय श्रेणी.

आरक्षण – ट्रेन क्र.12125/12126 साठी बुकिंग दि. २०.७.२०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in – संकेतस्थळावर सुरु होईल. या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. प्रवाशांना स्वतच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तन पाळण्याचा सल्ला दिला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नको ‘त्या’ गोष्टी लोकांच्या मनात आणून जातीय तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न, अजित पवारांची पंतप्रधानांवर टीका

Aprna

औरंगाबादेत शिवसेनेचा महापौर

News Desk

ॲमिनिटी स्पेसचा मुद्दा निकाली,अजित पवारांच्या उपस्थितीत मोठा निर्णय!

News Desk