मुंबई।राज्यात गेल्या काही दिवसापासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा दाखल होणार असल्याचा इशार हवामान खात्याने दिला आहे. राज्यात उद्यापासून(29 ऑगस्ट) मुसळधार पावसाचा इशारा हवामान खत्याकडून देण्यात आला आहे. पुढील चार दिवस वदर्भ, मराठवाडा ,मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र,उत्तर कोकण,मुंबई,ठाण्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या 30 ऑगस्टला विदर्भ आणि मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा. तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/QLgWPjOvwF…… भेट द्या.
Kindly visit https://t.co/89p4H3QwEY… for detailed district wise forecast and warnings.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 28, 2021
मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पश्चिम व मध्य भारतात क्षेत्रात प्रवासाच्या शक्यतेमुळे महाराष्ट्र राज्यात येत्या 4 ते 5 दिवसात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या मुंबई,ठाण्यासह राज्यातील इतर भागात पावसाने काही दिवसापासून विश्रांती घेलती असून उद्यापासून पुढील काही दिवस पवसाची हजेरी लागणार आहे. काही दिवसापासून अपेक्षे प्रमाणे पाऊस पडत नव्हाता. यामुळे उन्हाची झळ लोकांना सहन करावी लागत होती. मुंबई महाविभागाचे उपमहासंचालाक के.एस होसाळीकर यांनी ट्विटरच्या माध्यामातून राज्यातील हवामानी माहिती दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.