HW News Marathi
महाराष्ट्र

मनसेचे पक्ष बांधणी सुरू, या ‘३’ नेत्यांची कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचे प्रभारी म्हणून नियुक्ती

कल्याण | मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम आणि कल्याण डोंबिवली महापालिकेतील गटनेते मंदार हळबे यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात पक्ष बांधणीला आता सुरुवात झाली आहे. कल्याण-डोंबिवलीतील आजी-माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरेंनी वैयक्तिक चर्चा केली. मनसेची गळती रोखण्यासाठी नितीन सरदेसाई, अविनाश जाधव आणि शिरीष सावंत या नेत्यांना कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

मनसेच्या डोंबिवली शहराध्यक्षपदी मनोज घरत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरेंनी घरत यांच्यावर जबाबदारी सोपवली. आता नितीन सरदेसाई, अविनाश जाधव आणि शिरीष सावंत या राज ठाकरेंच्या तिघा विश्वासू नेत्यांवर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी, गळती रोखणे आणि अधिकाधिक उमेदवारांना विजयी करणे ही जबाबदारी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सत्ता गेल्यानंतर तुमच्या वृत्तीमधला हा बदल आम्ही ‘ बंगला सोडतानाही पाहिला – रुपाली चाकणकर

News Desk

नवाब मलिकांच्या अटकेनंतर नितेश राणेंचे ‘हे’ ट्वीट चर्चेत

Aprna

शिवजयंतीदिनी छत्रपती शिवाजी महाराजांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वंदन 

News Desk