HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरेंचा लाडका ‘जेम्स’गेला,ठाकरे झाले भावूक…

मुंबई | कोणताही पाळीव प्राणी हा आपल्या कुटुंबातील एक सदस्यचं असतो. त्याच्या मृत्यूनेही आपल्याला तितकाच त्रास होतो जितका इतर दुसरा कोणताही सदस्य गेला असतो. असंच दु:ख मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कोसळले आहे. राज ठाकरेंच्या कुटुंबातील श्नान म्हणजेच त्यांच्या लाडक्या जेम्सचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री १२ च्या सुमारास जेम्सचं निधन झालं आहे.

राज ठाकरे हे श्वान प्रेमी आहेत. ग्रेट डेन प्रजातीचा जेम्सही अनेक वर्ष त्यांच्यासोबत होता. परंतु वयोमानानुसार जेम्सने काल अखेरचा श्वास घेतला. लाडक्या कुत्र्याच्या निधनाने राज ठाकरेंना धक्का बसला आहे. राज ठाकरेंकडे एकूण तीन ग्रेट डेन होते. त्यापैकी बॉन्ड आणि शॉन आधी गेले, तर आता जेम्सही गेला आहे.

जेम्स जेम्ससोबत राज ठाकरे यांचे तरुणपणातील अनेक फोटो याआधी समोर आलेले आहेत. राज ठाकरेंना जेम्सचा विशेष लळा होता. अनेक ठिकाणी ते जेम्सला सोबत घेऊन जात. राज ठाकरे यांच्याकडे एकूण तीन ग्रेट डेन होते. दरम्यान, राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांच्याकडे मुफासा (गोल्डन रिस्टरिव्हर) आणि ब्ल्यू (हस्की) हे कुत्रे आहेत.

२०१८ मध्ये राज ठाकरेंच्या बॉन्ड या कुत्र्याचंही निधन झालं होतं. साडेबारा वर्षांपासून बॉण्ड हा राज ठाकरे यांच्यासोबत होता. राज ठाकरे यांनी स्वतः परळच्या स्मशानभूमीत बाँडला अखेरचा निरोप दिला होता.राज ठाकरे यांचे श्वानप्रेम लोकांच्या परिचयाचं आहे. कृष्णकुंज या निवासस्थानी गेल्या काही वर्षांपासून हे कुत्रे पाळण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार आणि भाजपच्या राम शिंदेंची गुप्तभेट ! चर्चा सुरू

News Desk

आम्ही वाघाच्या काळजाचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे शिलेदार ,मुख्यमंत्रीप्रताप सरनाईकांच्या पाठिशी !

News Desk

देशात पहिल्यांदाच जेल पर्यटनाची संकल्पना महाराष्ट्रात येणार, येरवडा जेलमधुन होणार सुरुवात – अनिल देशमुख

News Desk