HW News Marathi
महाराष्ट्र

वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी राज ठाकरेंना जामीन मंजूर

नवी मुंबई । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी २०१४ साली वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी आज (६ फेब्रुवारी) राज ठाकरे स्वतः न्यायालयात हजर झाले आहेत. या प्रकरणी आता राज ठाकरे यांना जामीन मंजूर झाला आहे. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर राज यांना जामीन मंजूर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ मे रोजी होणार आहे.

राज ठाकरे यांच्या वकिलांनी म्हणजे ऍड राजन शिरोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “न्यायालयातून साक्षीदारांना समन्स देण्यात येईल आणि केसला सुरुवात होईल. त्याचप्रमाणे, यापुढे राज ठाकरे यांना सुनावणीसाठी यावे लागणार नाही.” वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी राज ठाकरे यांच्यावर २०१४ साली वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. वारंवार समन्स पाठवूनही राज ठाकरे उपस्थित राहिले नाहीत त्यामुळे राज यांच्याविरोधात वॉरंट काढले होते.

राज ठाकरे याच पार्श्वभूमीवर स्वत: न्यायालयात हजर राहिले होते. यावेळी नवी मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली होती. यावेळी न्यायालयाकडून राज ठाकरे यांना जामीन मंजूर झाला आहे. यावेळी राज ठाकरेंसोबत अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, गजानन काळे उपस्थित होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र हा लेच्या पेच्यांचा देश नाही, जो आडवा येइल त्याला पाडून गुढी उभारू!

News Desk

शिक्षक मतदार संघ निवडणूक: विभागीय आयुक्त कार्यालयात २४ तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित राहणार

Aprna

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आजपासून बारामती पॅटर्न सुरू

News Desk