HW News Marathi
महाराष्ट्र

शिक्षक मतदार संघ निवडणूक: विभागीय आयुक्त कार्यालयात २४ तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित राहणार

नागपुर  । भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) शिक्षक मतदार संघाचा द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे. नागपूर शिक्षक मतदार संघात (Nagpur Teachers Constituency) निवडणुकीसंदर्भात मतदाराला कोणत्याही प्रकारच्या तक्रारी असल्‍यास यासाठी  विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये २४ तास कार्यरत नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

नागपूर विभाग मतदारसंघात निवडणूक संदर्भात मतदाराला कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास किंवा मत मिळविण्यासाठी रोख रक्कम किंवा वस्तु देणे, कोणत्याही प्रकारच्या धमक्या, मताधिकाराच्या मुक्त वापरात बळजबरी करणे, निवडणूक फायद्यासाठी राज्य यंत्रणेचा गैरवापर हात असल्यास  नियंत्रण कक्षाचा dycommgadngp@gmail.com यावर संपर्क साधावा किंवा विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे प्रत्यक्ष हजर राहुन तक्रार दाखल करावी. अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गणेश विसर्जनासाठी फक्त 5 ते 10 जणांना परवानगी!

News Desk

शिवस्मारक समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा विनायक मेटेंनी दिला राजीनामा

News Desk

अर्णब गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

News Desk