HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

सीएए-एनआरसीला राज ठाकरेंचे पूर्ण समर्थन, लवकरच अमित शहांना भेटणार

मुंबई | “मी मराठीबरोबर हिंदू देखील आहे. धर्मांतर केले नाही, मी आजही मराठी आणि हिंदू आहे,” असे स्पष्ट व्यक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. राज ठाकरे पुढे म्हणाले, पाकिस्तान आणि बांग्लादेशमधून आलेल्या मुस्लमांना आधी हुसकावून लावणार असेल तर म्हणत एनआरसी आणि सीएएला माझा केंद्रला पूर्ण पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या ९ फेब्रुवारीला मनसेचा सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार आहे,” अशी माहिती राज ठाकरे यांनी आज (२३ जानेवारी) गोरेगाव येथील नेस्को सेंटर मनसेच्या महाअधिवेशनातील भाषणादरम्यान दिली.

दरम्यान, “आज राज्यात बाहेरच्या देशातून आलेले मौलवी जाऊन देशविघातक कारवाया करत आहेत अशी माझी माहिती आहे आणि ह्या विषयावर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि देशाच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार, असे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंनी झेंड्याचा रंग बदलला म्हणजे राज ठाकरे बदलला असे होत नाही. मी तोच आहे जो पूर्वी होतो, माझी मत तीच आहे जी पूर्वीपासून आहे. रंग बदलून सरकारमध्ये जाणारा नाही,” नाव न घेता शिवसेनेला टोला लगावला.

राज ठाकरे यांच्या हस्ते पक्षाचा नव्या झेंड्याचे अनावरण झाले आहे. मनसेचा नवा झेंड्या हा केशरी रंगाचा असून छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा मध्यभाग राजमुद्रा आहे. मनसेचे आज (२३ जानेवारी) पहिले राज्यव्यापी महाअधिवेशन आहे. राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्याकडे नेते पदी निवड करण्यात आली आहे.

राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

 

 • येत्या ९ फेब्रुवारीला भव्य मोर्चा काढणार आहे.
 •  पाकिस्तान आणि बांग्लादेशमधून आलेल्या मुस्लमांना  घूसखोरांना आधी बाहेर काढा, आणि  असे म्हणत एनआरसी आणि सीएएला माझा केंद्रला पूर्ण पाठिंबा दिला आहे.
 • मी रंग बदलून सरकार मध्ये जात नसतो, असे म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेला टोला लगावला
 • योग्य काम केले तेव्हा मोदींचे कौतुक केले, राज ठाकरे विरोधाला विरोध करणार माणून नाही
 • पाकिस्तानला जाणाऱ्या बस देवा बंद करा, असा सल्ला राज ठाकरेंनी केले आहे
 •  भारत म्हणजे धर्म शाळा आहे का?, असा सवाल राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सीएएवरून निशाना साधला
 • मशिदींवरचे भोंगे हवेत कशाला? आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का?- राज ठाकरे.
 • भाषा कोणत्या धर्माची नसून प्रातांची असते
 • देशाला मानणारे मुस्लीम आमचेच आहे
 • ऊर्दू मुस्लमानांची भाषा कधीच नव्हती
 • ए.पी. जे अब्दुल कलाम, जहीर खान, ज्यावेद अख्तर यांना कोणी नाकारू शकत नाही.
 • मी मराठीबरोबर हिंदू देखील आहे. धर्मांतर केले नाही, मी आजही मराठी आणि हिंदू
 • माझ्या मराठी ला नख लावालाय प्रयत्न केला तर मी मराठी म्हणून अंगावर जाईल आणि हिंदू म्हणून नख लावला तर हिंदू म्हणून अंगावर जाईल.
 • धर्माला धक्का लावला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन – राज ठाकरे.
 • झेंडा बदलणे ही काही नवीन गोष्ट नाही, ह्या आधी जनसंघाने देखील झेंडा आणि नाव बदललंच आहेः राज ठाकरे.
 •  निवडणुकीत राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही, असे देखील राज ठाकरेंनी स्पष्ट केले
 • झेंड्यावरील राजमुद्रा व्यवस्थित पणे हाताळा
 • असाच नाही, हाता घेतल्यानंतर हा झेंडा इकडे तिकडे पडा कामा नये, अशा कडक शब्दात सैनिकांना खडसावले
 • २००६ साली पक्ष स्थापन झाला तेव्हा माझ्या मनात हाच झेंडा होता
 • भवगाव झेंडा पक्ष स्थापनेवेळी माझ्य मनात होता.
 • आपले सरकार आल्यावर देखील शॅडो कॅबिनेट आहे
 • राज्य सरकारातील महत्त्वाची कामे करणाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेट, तयार करण्यात आली आहे
 • संघटनेचे काम करायचे असेल तर राजगडावर नाव नोंदवले पाहिजे
 • वाईट दिवस आले की , सगळे सल्ले द्याला लागतात.
 • यशाला बाप्प खूप असतात,
 • पक्षातील पदांचा, नेत्यांचा मान ठेवावा लागेल
 • सोशल मीडियाचा चुकीचा वापर करू नका, राज ठाकरेंचा सल्ला
 • उत्तम काम करा, त्याची सोशल मीडियावर टाका, राज ठाकरेंचा सल्ला
 • पक्षाबद्दल कार्यकर्त्यांनी सोशल मीडियार लिहू नये, अशी सूचना राज ठाकरेंनी मनसैनिका दिले
 • येत्या २५ मार्चला गुढीपाडव्या निमित्ताने मनसेची शिवतीर्थावर जाहीर सभा आहेत.
 • राज ठाकरेंनी उपस्थितींना नवा झेंडा अवडला का ?असा मनसैनिकाना सवाल विचारला
 • माझ्या तमाम हिंदू बंधवांनो म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात

Related posts

प्रत्येक निवडणुकीला चिन्ह बदलतच विजय मिळवत आलो आहे !

News Desk

नागपूरमध्ये रुग्णालयाला भीषण आग

News Desk

मध्य प्रदेशात संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ७४ टक्के मतदान

News Desk