HW News Marathi
महाराष्ट्र

“केंद्र, राज्य सरकार सर्वांना मान्य आहे तर अडलंय कुठे?”, आरक्षणावरून राज ठाकरेंचा सरकारला संतप्त सवाल

पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज (११ जुलै) पुणे दौऱ्यावर असून यावेळी त्यांच्या हस्ते पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं केंद्र आणि राज्य सरकार दोघांनाही मान्य आहे तर मग ओबीसी आरक्षण अडलंय कुठे? अशी विचारणा यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दाही उपस्थित केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असून यावेळी त्यांच्या हस्ते पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

केंद्र, राज्य सरकार सर्वांना मान्य आहे तर अडलंय कुठे?

“राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादीचं सरकार असताना मराठा आरक्षणासाठी एक मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह सर्व पक्षांचे नेते त्यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यावेळी मी सगळ्यांनाच मान्य आहे तर मग अडकलंय कुठे असं विचारलं होतं. फक्त मुद्दा उपस्थित करायचा आणि माथी भडकावायची एवढाच उद्योग आहे का? ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही केंद्र, राज्य सरकार सर्वांना मान्य आहे तर अडलंय कुठे?,” अशी विचारणा राज ठाकरेंनी केली आहे.

समाधान कशावर व्यक्त करावं?

सर्वांना मान्य आहे त कोणी अडवलं आहे? अशी विचारणा करताना राज ठाकरेंनी कोर्टात व्यवस्थित बाजू का मांडली जात नाही असंही विचारलं. तसंच सगळ्यांना व्यासपीठावर आणून चर्चा केली पाहिजे अशी मागणी केली. निवडणुकांच्या तयारीसाठी आलो असल्याचं मान्य करताना राज ठाकरेंनी सगळ्याच निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत त्यामुळे काय होईल याची कल्पना नसल्याचं म्हटलं. तसंच लॉकडाउनच्या काळात सरकारचा कारभार पहायला मिळालेलाच नाही. त्यामुळे समाधान कशावर व्यक्त करावं? असा टोलादेखील लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काश्मीरमध्ये पोलिस अधिकाऱ्याची दगडानं ठेचून हत्या

News Desk

पोटनिवडणूक निकालांवरून फडणवीसांचा सरकारवर निशाणा!

News Desk

मनमोहन सिंग यांच्या काळात पेट्रोलचा दर किती आणि आता किती?,अर्थसंकल्पात बोलेनच, अजित पवार बरसले

News Desk