HW News Marathi
महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांना ऑडिओ क्लिप्स पाठवल्या?, राज ठाकरे म्हणतात….

पुणे | मनसे आणि भाजपच्या युतीबाबत राजकीय वर्तृळात जोरदार वारे वाहू लागले. मात्र, सध्या तरी मनसेसोबत युती करण्याचा विचार नसल्याचं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. ही बाब ताजी असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उत्तर भारतींच्याबद्दल काय विचार आहेत त्याच्या ऑडिओ क्लिप्स भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं होते. तशी बातमी समोर आली होती. यावर आता स्वत: राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

राज ठाकरे सध्या आगामी पालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर दौऱ्यावर आहेत. सध्या ३ दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बातचीत करताना त्यांनी त्या ऑडिओ क्लिप्स बाबत खुलासा केला आहे. राज ठाकरे असं म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांना कोणत्याही ऑडिओ क्लिप्स पाठवण्यात आल्या नाही. राज ठाकरे यांच्या उत्तर भारतीयांवर केलेल्या केलेल्या भाषणाची क्लिप पाठवली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

राज ठाकरे असं म्हणाले की, क्लिप्सवरुन भाजप-मनसे युतीचं सुत जूळवू नका. माझ्या भूमिका स्पष्ट आहेत. कोणत्याही क्लिप्स चंद्रकांत पाटलांकडे गेल्या नाहीत, असं राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. त्यामुळे आता भाजप-मनसेच्या युतीवर राज ठाकरे यांनीच खुलासा केल्याने युतीच्या चर्चेला पुर्णविराम लागला आहे. दरम्यान, काल (२८ जुलै) मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि अमित टाकरे हे ही नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी संदीप देशपांडे असं म्हणाले की, नाशिक महापालिका निवडणूक मनसे स्वबळावरच लढणार आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या आणि पक्षाच्या भूमिका या स्पष्टचं आहेत.

भाजप-मनसे एकत्र येण्याच्या आशा पुन्हा पल्लवित; राज ठाकरेंच्या ‘त्या’ क्लिप्स चंद्रकांत पाटलांकडे पोहोचल्या

राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या पार्किंग लॉटमध्ये ओझरती भेट झाली होती. त्याचवेळी राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविषयी माझी नेमकी काय भूमिका आहे, याच्या क्लिप्स तुम्हाला मी पाठवतो, असे राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांना सांगितले होते. त्यानुसार मनसेकडून या क्लिप्स चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्या. त्यामुळे राज ठाकरे आगामी पालिका निवडणुकीत भाजपशी युती करण्यासाठी उत्सुक आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्याची घडामोड पाहता या दिशेने आणखी एक सकारात्मक पाऊल पडले आहे. आता चंद्रकांत पाटील लवकरच भाजप आणि मनसेच्या युतीसंदर्भात घोषणा करतील, असे सांगितले जात होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंगणा विधानसभा मतदारसंघातील अनेक भाजप नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

चिपी विमानतळ होण्यात कुणाचं योगदान – बाळासाहेब थोरात

News Desk

…आणि राज ठाकरे नाशिकच्या महापौरांना सांगितलं ‘मास्क काढ’!

swarit