HW News Marathi
Covid-19

“जिम ओपन करा, बघू काय होतं” – राज ठाकरे

मुंबई | महाराष्ट्रात जवळपास चार महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटून गेला जिम बंद आहेत. त्यामुळे व्यायामप्रेमी आणि जिम व्यावसायिकांचा रोष वाढत आहे. ठाकरे सरकारकडे हा मुद्दा उचलून धरावा यासाठी जिम व्यावसायिक आणि बॉडीबिल्डर्सनी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (११ ऑगस्ट) दादर शिवाजी पार्क येथील कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. “जिम ओपन करा, बघू काय होतं” असा सल्ला यावेळी राज ठाकरे यांनी जिम व्यावसायिकांना दिला आहे.

“किती दिवस लॉकडाऊनमध्ये काढणार आहात? प्रत्येक जण आपली काळजी घ्या, प्रत्येकाची काळजी घ्या. केंद्राने गाईडलाईन्स दिल्या आहेत, त्या पाळून काळजी घ्या” असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. “केंद्र सांगतं जिम सुरु करा, विमानतळ सुरु करायला सांगितलं, राज्य म्हणतं आम्ही नाही करणार, मग राज्याला काही वेगळी अक्कल आहे का?” असा सवालही त्यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.

“पहिलं मला सांगा, जिम सुरु केल्यानंतर काळजी कशी घेणार?” असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारल्यानंतर जिम मालकांनी “कार्डिओ बंद करणार, सॅनिटायझेशन, एक तासाची एक बॅच अशा पद्धतीने सुरु करणार” असे सांगितले. नेहमी दादरमधील शिवाजी पार्क परिसरात दिसणाऱ्या व्यायामप्रेमींनी ‘कृष्णकुंज’बाहेर फलक घेऊन सरकारला प्रश्न विचारले. लॉकडाऊनच्या काळात जिम अनेक दिवस बंद आहे. सरकार जिम सुरु करण्यास परवानगी देत नाहीत. त्यामुळे मनसेने हा मुद्दा सरकारकडे मांडावा, या मागणीसाठी त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनावर मात करण्यासाठी टेस्ट, ट्रेसिंग व ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर काम करा – थोरात

News Desk

सोलापूरमध्ये ‘चेस द व्हायरस’ प्रभावीपणे राबवा!

News Desk

राजेश टोपे यांनी लॉकडाऊन ४ कसा असेल याचा दिला अंदाज

News Desk