HW News Marathi
महाराष्ट्र

खासगी डॉक्टरांना विमा मिळावा यासाठी राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

मुंबई | खासगी डॉक्टरांना विमा मिळावा यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. खासगी सेवेतील डाॅक्टरांचा कोरोना काळात सेवा देताना मृत्यू झाला तरी त्यांच्या कुटुंबाला विम्याचा लाभ देण्याचं सरकार नाकारत आहे. यात लक्ष घालून संबंधित डाॅक्टरांना विमा मिळवून देण्याबाबत योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. काही खासगी डाॅक्टरांचे शिष्टमंडळ राज ठाकरेंना २ दिवसांपूर्वी भेटायला गेले होते. त्यावेळी या डाॅक्टरांनी ही व्यथा त्यांच्याकडे मांडली होती. त्यानंतर राज यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी खासगी डाॅक्टरांनी दिलेल्या सेवेबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.

काय लिहिले आहे पत्रात?

‘कोरोना काळात या आजाराचा संसर्ग जसा पसरु लागला, तसा सरकारी आरोग्य व्यवस्थेवर येणारा ताण लक्षात घेऊन राज्य सरकारने सर्व खासगी दवाखाने रुग्णालये, पॅथाॅलाॅजी लॅब यांना सेवा बंद न करण्याचा व रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज राहण्याचा आदेश दिला. त्यानुसार राज्यातील बहुसंख्य खासगी डाॅक्टरांनी आपली बांधिलकी लक्षात घेऊन सेवा सुरु ठेवली,’ असे राज यांनी या पत्रात नमूद केले आहे.

‘यातच महाराष्ट्र सरकारचे अजून एक परिपत्रक आले की कोरोनाच्या काळात डाॅक्टर्स, इतर वैद्यकीय कर्मचारी, मग ते खासगी सेवेत असोत की सरकारी रुग्णालयांच्या सेवेत असोत, ह्या सगळ्यांना विम्याचे कवच असेल व यापैकी कोणाचाही कोविडमुळे मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला ह्या विम्यातून ५० लाख रुपये दिले जावेत. पण आता खासगी डाॅक्टरांना विम्याचे कवच देण्याचे सरकार नाकारत आहे,’ असेही राज यांनी या पत्रात म्हटले आहे.

 

जर केंद्र सरकारच्या योजनेनुसार खासगी सेवेतील डाॅक्टर्स व अन्य कर्मचाऱ्यांना विम्याचे कवच उपलब्ध असेल तर राज्य सरकार कोणत्या न्यायाने ते नाकारत आहे? याला असंवेदनशीलता म्हणायचे नाही तर काय म्हणायचे? असा सवाल राज यांनी या पत्रात उपस्थित केला आहे. सरकार खासगी डाॅक्टरांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करुन देणार व स्वतः आपली जबाबदारी विसरणार हे चूक आहे, असेही राज यांनी पत्रात नमूद केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितेश राणेंना आणखी एक धक्का; सहकार विभागाने राणेंचा मतदानाचा अधिकार नाकारला

Aprna

उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे पैशांची अफरातफर करतायत, सोमय्यांचा गंभीर आरोप

News Desk

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थानच्या विकासासाठी अर्थसंकल्पात ७४ कोटींची तरतूद केल्याबद्दल मंदिर देवस्थानाकडून उपमुख्यमंत्र्यांचे आभार

News Desk