HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरे घेणार राज्यपालांची भेट,कोणत्या मुद्दयांवर चर्चा होणार ?

मुंबई| गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या प्रश्नासाठी राजकीय नेते हे राजभवनावर राज्यपालांची भेट घेण्यासाठी दाखल होत आहेत. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेही आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. राज ठाकरे राज्यपालांशी कोणत्या मुद्दयांवर चर्चा करणार आहेत हे अद्याप अस्पष्ट आहे.लॅाकडाऊनच्या काळात राज ठाकरेंनी अनेक मागण्यासांठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीली आणि त्यांच्या बऱ्याच मागण्या सरकारने मान्य केल्या.मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंदिराच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरूद्ध राज्यपाल असा संघर्ष पाहायला मिळाला आहे.त्या पार्श्वभूमिवर राज ठाकरेंची राज्यपाल भेटीची वेळ महत्त्वपूर्ण आहे.

मात्र राज ठाकरे हे लोकांच्या प्रश्नासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत अशी माहिती आहे. लॉकडाऊन काळात अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी लोकांनी कृष्णकुंज गाठलं होतं, यात मुंबईचे डबेवाले, त्र्यंबकेश्वरचे पुजारी, ज्येष्ठ नागरिक, कोळी महिला, डॉक्टरांचे शिष्टमंडळ, महिला बचत गट अशा अनेक लोकांनी राज ठाकरेंकडे मदतीसाठी विनवणी केली होती. वेळोवेळी राज ठाकरेंनी या समस्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय हॉकी संघावर होतोय कौतुकांचा वर्षाव!

News Desk

आदरणीय पवारसाहेबांच्या घरावर अशा प्रकारे दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य! – जयंत पाटील

Aprna

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोडांना क्लिनचीट?

News Desk