HW News Marathi
Covid-19

राज ठाकरेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पत्रातून ‘ही’ मागणी

पुणे | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. रुग्ण संख्या जरीकामी होत असली तरी अद्याप रेल सेवा सगळ्यांसाठी उपलब्ध नाही आहे. याच कारणामुळे सर्वसामान्यांसाठी रेल सेवा सुरु व्हावी म्हणून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री युद्ध ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.

काय आहे पत्रात?

सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा चालू करण्यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. ‘मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा सर्वांसाठी अत्यंत तातडीनं सुरू करावी’, अशी मागणी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे करत आहे. हे पत्र त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटद्वारे शेअर केलं आहे.

 

दोन लस घेतलेल्यांना बाहेर पडण्याची परवानगी?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा मुख्यमंत्रयंशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. कोरोना लसीचे दोन डोस ज्यांनी घेतले आहेत त्यांना आता बाहेर पडण्याची परवानगी दिली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. याबाबत मी दोन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात निर्बंध लागू आहेत. दरम्यान, अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर दोन डोस घेतलेल्यांना आता बाहेर पडण्याची परवानगी मिळणार का हे पाहावं लागेल.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एक कोरोना रूग्ण सापडला तर बाजूची २० घरं सिल करणार,’या’ राज्याचा निर्णय!

News Desk

देशातील ७८ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण नाही | आरोग्य मंत्रालय

News Desk

शेतकरी, मंजूर, सूक्ष्म, लघुसह मध्यम उद्योगांसंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ निर्णय

News Desk