मुंबई । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उत्तर भारतीयांच्या मंचावर हिंदीतून संबोधित केले. उत्तर भारतीय महापंचायत समितीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दरम्यान, कायमच उत्तर भारतीयांच्या विरुद्ध भूमिका घेणारे राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
• उत्तर भारतीयांना समजावं म्हणून हिंदीतून भाषण
• राज ठाकरे यांचे प्रथमच हिंदीतून भाषण
• हिंदी एक चांगली भाषा आहे परंतु हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असे म्हणणे चुकीचे
• मी कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण द्यायला येथे आलो नाही.
• माझी भूमिका आजही तीच आहे. मी केवळ माझी भूमिका तुम्हाला हिंदीतून सांगण्यासाठी इथे आलो आहे.
• मी महाराष्ट्रीय आहे. साहजिकच मला वाटते की माझ्या महाराष्ट्रात आधी माझ्या स्थानिक लोकांना रोजगार संधी मिळाव्यात. मग उरल्या तर इतरांना मिळाव्यात
• ज्या राज्यात आपण जातो त्या राज्याचा, राज्यातील लोकांचा मान राखला पाहिजे.
• नोकऱ्यांसाठी इतर राज्यात का जावे लागते ? हा प्रश्न तुम्ही तुमच्या नेत्यांना विचारायला हवा
• इंदिरा गांधी, राजेंद्रप्रसाद यांच्या वक्तव्यांचा उल्लेख
• आपल्याला आंतरराज्य कायदा समजून घेण्याची गरज आहे.
• दररोज उत्तर भारतातून येणाऱ्या ४८ रेल्वे गाड्या भरून महाराष्ट्रात येतात.
• राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही हयगय चालणार नाही
• मुंबईत येणाऱ्या लोढ्यांमुळे पोलिसांवर प्रचंड ताण
• वेळ अशी आहे की आता तुम्हा लोकांना सांगावे लागेल की आता बस, आता इथे येऊ नका
• मी समजू शकतो की तुम्हाला तुमच्या राज्यात काम नाही म्हणून तुम्ही इथे येता. पण तुम्ही जिथे येत आहात त्या महाराष्ट्रातील युवकांनाच रोजगार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या.
• बाहेरचे लोक येतच राहिले तर राज्यातील स्थानिक लोकांना काम कसं मिळणार ?
• दक्षिण भारतातील लोकांना त्यांच्या राज्यात काम उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे तेथून येणारे लोंढे थांबले
• इतर राज्यांतून गुन्हेगार महाराष्ट्रात येणार असतील तर चालणार नाही
• माझं आंदोलन अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात
• या लोंढ्यामुळे महाराष्ट्राच्या समस्येत वाढ
• प्रत्येक राज्यात डोमीसाईलची अंमलबजावणी होणे आवश्यक
• माझ्या मनात उत्तर भरतीयांबद्दल कोणत्याही प्रकारचा रोष नाही
• संघर्ष टाळण्यासाठी प्रत्येक राज्यात रोजगार उपलब्ध व्हायला हवेत
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.