नाशिक | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोरोनाग्रस्त आहेत, त्यात नाशिकच्या मालेगावातही अनेक रुग्ण आहेत. नाशिकमधून कोरोना कायमचा घालवण्यासाठी आता मालेगावात संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज (२९ एप्रिल) एका बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भूजबळ आणि दादा भूसेही उपस्थित होते. मालेगावात लोकसंख्या अधिक आहे. त्यामूळे या भागात होम क्वॉरंटाईन करणे शक्य नाही आहे. त्यामूळे अशा भागातील लोकांना संस्थात्मक क्वॉरंटाईन करावे असा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
तसेच, या ठिकाणी २०० खाटांचे हॉस्पिटल सुसज्ज करण्यात आले आहे. या रुग्णालयात उपचाराच्या सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहेत. डॉक्टरांना किट्सही देण्यात येणार आहेत. मात्र अद्यापही १० ते २० डॉक्टर कामावर हजर झालेले नाहीत, हे डॉक्टर २४ तासात कामावर न आल्यास त्यांना निलंबित करण्याचे आदेशही देण्यात आल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.
आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यलाय येथे कोरोना उपाययोजना संदर्भात बैठक पार पडली.यावेळी गृहमंत्री ना.अनिलजी देशमुख, कृषिमंत्री ना.दादाजी भुसे,पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त,जिल्हाधिकारी,जिल्हा आरोग्यधिकारी व इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak pic.twitter.com/QJymThqZrT
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 29, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.