HW News Marathi
Covid-19

कोरोनामूळे जग थांबू शकत नाही – राजेश टोपे

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती काय आहे याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिली. कोरोनासोबत जगायला शिका असे रोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.. “कोरोना सोबत राहायला शिका याचा अर्थच हा आहे की यावर सध्या काहीही औषध नाही आणि उपचार नाही. त्यामुळे जग थांबू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला कामकाज सुरु करावेच लागणार आहे. त्यासाठी काही नियम असतील त्यांचे पालन करावे लागणार आहे. रेड झोनमध्ये जास्त बदल करण्यात नाही आहे.

रेड झोनमध्ये हॉटेलमधून घरी जेवण पाठवण्यास मूभा देण्यात आली आहे. कंपन्या या ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये सुरु करण्यात आल्या आहेत. नॉन रेड झोनमध्ये जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरु व्हायला हरकत नाही. संध्याकाळी ७ सकाळी ७ पर्यंत मात्र बंद पाळण्यात येणार आहे. दुकाने उघडतील मात्र त्यांच्या वेळा असतील असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढते आहे. मात्र या व्हायरसचा प्रादुर्भाव आपल्याला थांबवायचा आहे. मनात भीती न बाळगता पण जागरुकपणे आपल्याला काही गोष्टींना सामोरं जावं लागेल. आपण आपली मानसिकता बळकट केली तर आपल्याला पुढे जाता येईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत:च गाडी चालवत पंढरपुरात दाखल होणार

News Desk

लॉकडाऊन पुन्हा सुरू होणं हे राज्यासह सर्वसामान्य लोकांना पूरक ठरणारं नाही – रोहित पवार  

News Desk

राज्यात काल ८,३६९ नवे रुग्ण आढळले, तर २४६ जणांचा झाला मृत्यू

News Desk