HW News Marathi
Covid-19

पूरग्रस्त भागात लसीकरण वाढवणार, राजेश टोपेंची माहिती

पुणे | महाराष्ट्रात सध्या पावसाने हाहाकार माजवला आहे. एकीकडे नागरिक कोरोनाने ट्रस्ट आहेतच आता पुरामुळे अजून त्रास झाला हे दिसून येत आहे. संततधार पावसामुळे रोगराई वाढण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पूरस्थिती भागात लसीकरण वाढवण्याची घोषणा केली आहे. राजेश टोपे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. कोकणात निर्माण झालेल्या परिस्थिती बघून त्यांनी ही घोषणा केली आहे.

फडणवीसांसोबत चर्चा करू

राज्यात आधीच लसी उपलब्ध नसून या विषयावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात येईल, ही माहिती राजेश टोपेंनी दिली.“राज्याला चार पाच दिवसांत दहा लाख कोरोना प्रतिबंध लस मिळते. ती रोज मिळायला हवी. सध्या दोन तीन लाख मिळत आहेत,आम्ही केंद्राकडे जास्तीत जास्त लस मागणी करणार आहोत. त्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेबांना घेऊन भेटायला जाणार आहोत”, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

नियमांचं पालन

राज्यात आधीच लसीकरण कमी प्रमाणात होत आहेत, यातच आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पूर भागात लसीकरण वेगाने करण्याची घोषणा केली आहे. आयसीएमआरने जे जे प्रोटोकॉल दिले, ते पाळले. आता जर त्यांनी काही गाईड लाईन दिल्या तर त्याच्यानुसार निर्णय घेतले. शाळा सुरू करा असं सांगितले तर आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत बसून निर्णय घेऊ, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आम्ही सगळे शिथीलता देण्याबाबत रिपोर्ट मागवत आहोत. काही ठिकाणी शिथीलता देण्यात येतील का याचा रिपोर्ट मागवला आहे, लवकरच त्याचा निर्णय घेण्यात येईल, असं टोपे म्हणाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात गेल्या २४ तासात १९,१४८ नव्या रुग्णांची भर

News Desk

राज्यात आज २१,०२९ नव्या कोरोना रुग्णांची भर

News Desk

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारच्या निर्णयाला काँग्रेसचे समर्थन ! | नाना पटोले

News Desk