HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीसांनी नियुक्तीला विरोध केलेल्या राजकुमार ढाकणेंची हकालपट्टी

मुंबई | महाराष्ट्र राज्य पोलिस तक्रार प्राधिकरणाचे सदस्य राजकुमार ढाकणे यांच्यावर कारवाई करत त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. तपासात ढाकणे यांच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी राजकुमार ढाकणे यांच्या नियुक्तीवरुन मोठा वादंग उठला होता. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ढाकणेंच्या नियुक्तीला आक्षेप घेतला होता. यासंदर्भातील चौकशी अहवालानंतर ठाकरे सरकारने ढाकणेंना हटवण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे

राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी राजकुमार ढाकणे प्रकरणाची चौकशी केली. अहवालात ढाकणे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद असल्याचे समोर आले. 2015 मध्ये राजकुमार ढाकणे यांनी हत्येच्या प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पुण्यातील कोरेगाव पोलीस स्टेशनात गुन्ह्याची नोंद आहे. त्या आधारावर राजकुमार ढाकणे यांना महाराष्ट्र राज्य पोलिस तक्रार प्राधिकरणामधून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीसांचा विरोध

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, पोलिसांच्या विरोधात होणाऱ्या तक्रारींबाबत चौकशीसाठी राज्य पोलिस तक्रार प्राधिकरण गठित करण्यात आला होता. 14 जुलै 2020 रोजी राजकुमार ढाकणे यांच्या नियुक्ती संदर्भात राज्य शासनाच्या गृह विभागाने नोटीफिकेशन काढले होते. त्यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ढाकणेंच्या नियुक्तीला विधानसभेत आक्षेप घेतला होता. त्यानंतर गृह खात्याने चौकशी बसवली होती.

फडणवीसांच्या पत्रात काय आहे?

राज्य सरकारच्या पोलिस ट्रिब्युनल अर्थात पोलिस तक्रार प्राधिकरणावर गृह विभागाने केलेल्या राजकुमार ढाकणे यांच्या नियुक्तीवरुन गेल्या वर्षीच मोठा वादंग उठला होता. देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्तीला विरोध करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं होतं. पोलिस खात्यातील अंतर्गत तक्रार सोडवण्याचं काम करत असलेल्या आणि सत्र न्यायालयाइतके अधिकार असलेल्या या पदावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पुण्यातल्या राजकुमार ढाकणे या व्यक्तीची नेमणूक करण्यात आल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एवढेही येऊ नका की आम्हालाच बाहेर पडावे लागेल !

News Desk

धक्कादायक! बीडमध्ये गुढीपाडव्याच्या माथेफिरूने चाकूने वार करून पुजाऱ्याची केली हत्या!    

Aprna

घोटाळ्यात चौकशीसाठी नेमलेल्या समितीचे पुढे काय होते !

News Desk