HW News Marathi
देश / विदेश

सुपरस्टार रजनीकांतचा राजकारणाला रामराम!

चेन्नई | दाक्षिणात्य सुपरस्टार, थलायवा म्हणून ओळखले जाणारे रजनीकांत यांनी आता राजकारणाचा निरोप घेतला आहे. राजकारणात पुनरागमन करण्याची कोणतीही शक्यता नाही, असं स्पष्ट करतानाच रजनीकांत यांनी ‘रजनी मक्कल मंद्रम’ हा राजकीय पक्ष विसर्जित करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. आरएमएमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर रजनीकांत यांनी हा निर्णय घेतला आहे.

राजिकान्टने संभ्रमावर पडदा टाकला

राजकारण सोडण्याची शक्यता तामिळनाडू मध्ये सुरूच होती. २९ डिसेंबर २०२० रोजी रजनीकांत यांनी राजकारणात येणार नसल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्यांनी राजकारणात येण्याबाबत विचार करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे तामिळनाडूतील राजकारणात हालचाल सुरू झाली होती. त्यानंतर त्यांनी तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुका न लढण्याचा निर्णयही घेतला. त्यामुळे रजनीकांत राजकारण सोडणार असल्याचं म्हटलं जात होतं. आता त्यांनी त्यांच्या राजकारणात येण्याबाबतच्या संभ्रमावर पडदा टाकला आहे.

रजनीकांत यांनी गेल्यावर्षी एक चिठ्ठी लिहून त्यांची भूमिका जाहीर केली होती. मी राजकीय पक्ष सुरू करू शकत नाही, याचा मला खेद आहे. अत्यंत जड अंतकरणाने मी हा निर्णय घेत आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. यावेळी त्यांनी कोरोनाचं कारणही पुढे केलं होतं. मी लोकांना भेटलो आणि कोरोना संक्रमित झालो तर माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनाही संसर्ग होईल. त्यांनाही संघर्ष करावा लागेल. जीवनातील शांततेसह त्यांचं मोठं आर्थिक नुकसानाही होईल, असं रजनीकांत म्हणाले होते.

रजनीकांत पक्षाचं विसर्जन

‘रजनी मक्कल मंद्रम’ हा संपूर्ण पक्ष विसर्जित करण्यात येत आहे. यापुढे हा पक्ष कार्यरत राहणार नाही, अस्तित्वात राहणार नसल्याचं रजनीकांत यांनी स्पष्ट केलं. भविष्यात राजकारणात पुनरागमन करण्याची कोणतीही योजना नाही. मी राजकारणात येणार नाही, असं रजनीकांत यांनी स्पष्ट केलं. रजनीकांत यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपसभापती पदासाठी निवडणूक होणार 

News Desk

“वाह रे मोदी तेरा खेल”; इंधन दरवाढीविरोधात युवा काँग्रेस आक्रमक

News Desk

यास चक्रीवादळाचं रौद्ररुप, ओडिशामध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात

News Desk