HW News Marathi
देश / विदेश

सिलचर-तिरुवनंतपुरम एक्स्प्रेसच्या ३ डब्यांना भीषण आग

नवी दिल्ली | सिलचर-तिरुवनंतपुरम एक्स्प्रेसच्या ३ डब्यांना रविवारी (९ जून) भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. सिलचर येथून निघण्यापूर्वी साफसफाईकरिता पिट लाईनवर उभ्या असलेल्या या एक्प्रेसच्या एका डब्याला आग लागली. त्यानंतर ही आग एक्स्प्रेसच्या ३ डब्ब्यांपर्यंत पसरत गेली. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सिलचर-तिरुवनंतपुरम एक्स्प्रेसला लागलेल्या या आगीमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. आगीची माहिती मिळताच सिलचर अग्निशमन दल व एसडीआरएफ तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वीरांचा अपमान करणाऱ्या कंगनाबेनलाही सर्वोच्च नागरी पुरस्कार, हे देशाचे दुर्दैव!

News Desk

जेईई ॲडव्हान्सड परीक्षेची तारीख जाहीर!

News Desk

बीड जिल्ह्यातील लोक प्रतिनिधींसह पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे थेट दिल्लीत!

News Desk