HW News Marathi
महाराष्ट्र

उस्मानाबादत बांधकाम विभागातील कनिष्ठ सहाय्यक- दीड हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

उदय साबळे पाटील । याबाबतची अधिक माहिती अशी की, काल (१४ मार्च) उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या भूम येथील कनिष्ठ सहाय्यक राजश्री उत्तमराव शिंदे यांना दीड हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली आहे

तक्रारदाराचे वडील हे मैल कामगार म्हणून 2016 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर 2021 मध्ये त्यांची सुधारित वेतन निश्चिती बाबत आदेश काढण्यात आले होते. सदर फरक रक्कम बिलाच्या रुपये 91257 रुपयांच्या चेकवर साहेबांची सही घेऊन देण्यासाठी आरोपीने तक्रारदार यांच्याकडे 1500 रुपयांच्या लाचेची पंचांसमक्ष मागणी करून स्वीकारली.

या कार्यवाहीसाठी सापळा अधिकारी -प्रशांत संपते, पोलीस उपअधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद, यांच्या पथकाने ही कार्यवाही केली.

मार्गदर्शक डॉ.राहुल खाडे पोलीस अधीक्षक औरंगाबाद, विशाल खांबे अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद, यांनी मार्गदर्शन केले

सदरील सापळा पथकात पो.अ. दिनकर उगलमुगले, मधुकर जाधव, अर्जुन मारकड, विशाल डोके, यांनी काम पाहिले.

कोणताही शासकीय अधिकारी कर्मचारी कायदेशीर कामासाठी लाच मागत असेल,तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद येथे संपर्क साधावा,असे आवाहन मा. पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद यांच्या वतीने करण्यात आले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित पवारांनीच केला…

News Desk

Hw Exclusive | टिकटाॅकपेक्षा भारत महत्वाचा, टिकटाॅकस्टार गुलिगत

News Desk

झारखंड सरकार पाडण्यात आपला हात नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण

News Desk