HW Marathi
HW एक्सक्लुसिव महाराष्ट्र मुंबई राजकारण

माझं रक्त उसळतं पण शेतकऱ्यांसाठी आज संसदेत मी नाहीये याची खंत वाटते -राजू शेट्टी

मुंबई | मोदी सरकारने ज्या कृषी विधेयकांना एतिहासिक विधेयक असे म्हटले,त्या विधेयकांना लोकसभा आणि राज्यसभेतून जरी पारित करण्यात आले तरी देशातील शेतकऱ्यांनी याचा तीव्र विरोध केला. याच पार्श्वभूमिवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी एचडब्ल्यू मराठीने संवाद साधला आहे.

प्रश्न – महाविकास आघाडी सरकारची भूमिका या विधेयकावर राज्यसभेत आणि लोकसभेत वेगवेगळी दिसली. तर स्वत: शरद पवार या विधेयकाच्या संमत्तीसाठी उपस्थित नव्हते. त्यांनी जरी त्यावर स्पष्टीकरण दिले असले तरी त्यांच्या भूमिकेबद्दल प्रश्न उभा केला जात आहे. यावर तुम्हाला काय वाटते?

राजू शेट्टी – “एकतर महाविकास आघाडीबद्दल संशयाचे वातावरण जाणीवपूर्वक केलं जात आहे. इतक्या घाईत संसदेमध्ये ही विधेयकं चर्चेला आणली. अनेक खासदारांना माहित देखील नव्हते की ही विधेयकं चर्चेला येणार आहेत. आणि त्यामुळे अनेक जण बेसावध राहिले आणि चर्चेत भाग घेता आला नाही. शिवसेनेला सुरुवातीला आपली भूमिका गोंधळात का ठेवावी वाटली याबद्दल माझ्याही मनांत संभ्रम आहे.मात्र, नंतर सेनेने आपली भूमिका सावरली. आणि त्या विधेयकाला विरोध करण्याची भूमिका घेतली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचीही भूमिका विरोधाची होती. दरम्यान, ५० वर्ष ज्यांनी संसदेत काम केलं आहे अशा शरद पवारांनाही माहित नव्हतं की हे विधेयक चर्चेला येणार आहे. आणि त्यावेळी मराठा क्रांती मोर्च्याच्या काही कार्यकर्त्यांसोबत त्यांच्या बैठका होत्या त्यामुळे ते संसदेत हजर नव्हते आणि त्यावर विश्वास ठरवायला हवा असं माझे मत आहे”, असे राजू शेट्टी यांनी एच डबल्यू मराठीशी बोलताना म्हटले आहे.

प्रश्न – तुम्ही माजी खासदार आहात. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्ही आवाज उठवलेला आम्ही पाहिला आहे. मात्र यावेळी संसदेत तुम्ही नव्हता. जर तुम्ही संसदेतं असता या विधेयकांच्या वेळी तर काय परिस्थिती असती ?आणि तुम्ही नव्हता तर त्याची खंत वाटते का?

राजू शेट्टी- नक्कीच. माझं रक्त उसळत होतं. कारण अशी शेतकरी विरोधी विधेयकं लोकसभेत येत आहेत आणि आपण विरोध करण्यासाठी तिथे उपस्थित नाही आहोत याची खंत होतीच. रस्त्यावरच्या लढाईला मर्यादा येतात निर्णायक संघर्ष सभागृहातला असतो. आणि आपण तिथे नसणं हे मनाला चुटपुट लावून गेली. परंतु लोकशाहीमध्ये लोकांनी दिलेला निर्णय मान्यही करायला लागेल. ज्या आक्रमकतेने या विषयावर सभागृहात चर्चा व्हायला हवी होती ती झाली नाही. २००९ साली मी परस्पर विरोधी असलेल्या मुलायम आणि मायावती यांनाही एकत्र आणले होते. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला मी सभागृहात नव्हतो याची खंत मनात नक्कीचं आहे.

Related posts

भोकर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी संगीता विनोद चिंचाळकर तर उपाध्यक्षपदी जरीना शेख युसूफ

News Desk

आता धनगर समाजाला देखील लागू होणार अनुसूचित जमातीच्या २२ योजना

News Desk

मुले विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश,

News Desk