HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

दूध आंदोलन म्हणजे पुतण्या- मावशीचं प्रेम आहे ,राजू शेट्टी यांचा भाजपला टोला

कोल्हापूर | राज्यभरात दूध उत्पादक संघर्ष समिती आणि भाजपसह विरोधी पक्षाने दूध दरवाढीसाठी आंदोलन पुकारले आहे. यावरून राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर, ‘अलिकडे फडणवीसांचे सगळेच मुहूर्त चुकत आहेत. दूध आंदोलनासाठी त्यांनी काढलेला मुहूर्तही चुकीचा आहे. शासकीय सुट्टीच्या दिवशी आंदोलनाकडे कोण लक्ष देणार? असा प्रश्न उपस्थित करत टोला लगावला आहे.  यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी देखील भाजपच्या दूध आंदोलनावर टीका केली आहे.

“आज भाजप आणि विरोधीपक्ष केवळ राज्य सरकारविरोधात आंदोलन करत असतील तर हे पुतणा-मावशीचं प्रेम आहे. कारण ठोस उपाययोजना ही केंद्र सरकारनेच केली पाहिजे. आयात थांबवली पाहिजे. निर्यातील अनुदान द्यायला हवे. तसेच जीएसटी मागे घेतला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने अभूतपूर्व संकटात सापडलेला दूध उत्पादक यातून बाहेर पडेल,” असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

Related posts

किमान समान कार्यक्रमाच्या आराखड्याला अंतिम रुप, मंजुरीसाठी दिल्लीला पाठवणार

News Desk

मराठी शाळांदेखील पाच दिवसांचा आठवडा करा अशी मागणी

rasika shinde

#CoronaVirus : पश्चिम-मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकीटात वाढ, गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय

अपर्णा गोतपागर