HW News Marathi
महाराष्ट्र

५ राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत रिपाई देखील शर्यतीत उतरणार

मुंबई | येत्या वर्षभरात पाच राज्यांमध्ये निवडणुका होत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या निवडणुका लढवणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. रिपाईला किमान ३ ते ४ जागांवर तिकीट मिळावं, यासाठी लवकरच भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेणार आहे. तसेच जिथे शक्य होईल तिथे भाजपला पाठिंबा देऊ, असेही रामदास आठवले म्हणाले आहेत.

काही महिन्यांपूर्वी बिहार विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या. त्यानंतर आता येत्या वर्षभरात आणखी पाच राज्यांमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, पाँडिचेरी या पाच राज्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहेत.

नुकतंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांनी या पाच राज्यातील निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे. येत्या पाच राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये रिपाई लढवणार आहे. रिपाईला किमान ३-४ जागांवर तिकीट मिळावं यासाठी लवकरच आठवले भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आंदोलकांबाबत जे बोलले, त्याचा अर्थ चुकीचा घेतला गेला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली होती. मात्र त्या दोघांमध्ये मुख्यमंत्रिपदाची चर्चा झालेली नाही. शिवसेना आणि आम्ही आधी एकत्र होतो. आता शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या बिळात गेली आहे, असा टोलाही आठवलेंनी लगावला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लावलेली चौकशी योग्य नाही. ट्विट करणाऱ्यांना व्यक्तीस्वातंत्र्य आहे. या सरकारची चौकशी करावी लागेल, असेही आठवले म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दारू पिऊन नाचणारे 12 इंजिनियर निलंबित: विडीओ वायरल

News Desk

“राम्या पोरी पळव…पंकु चिक्की घे…”, राष्ट्रवादीची जोरदार टीका

News Desk

गावठी कट्ट्यातून गोळी सुटल्याने बालकाचा मृत्यू

News Desk