HW News Marathi
महाराष्ट्र

राणेंचा मंत्रिमंडळातील क्रमांक कितवा ?

मुंबई – राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची सध्या जोरदार चर्चा आहे. याचर्चेत महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचेही बोलले जाते. मात्र राणे मंत्रिमंडळात आले तर त्यांचा क्रमांक कितवा असणार याचे उत्तर आता स्पष्ट झाले आहे. नारायण राणे हे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ज्येष्ठतेनुसार त्यांचा मुख्यमंत्र्यानंतर दुसरा क्रमांक लागू शकला असता मात्र त्या आधीच त्यांना दणका बसला आहे. सरकार तर्फे मंत्र्यांच्या ज्येष्ठतेची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत विधानपरिषदेतील सभागृह नेत्याचे स्थान मंत्रिमंडळात दुसरे असेल असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे राणेंचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यास त्यांना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यानंतरच बसावे लागणार आहे. एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे दुसरे स्थान पाटील यांना मिळाले होते,ते मागील आठवड्यात एक आदेश जारी करून मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायम केले आहे. राणेंचा मंत्रिमंडळात समावेश झाला तर माजी मुख्यमंत्री म्हणून राज शिष्टाचारानुसार त्यांचे मंत्रिमंडळात दुसरे स्थान राहिले असते. मात्र त्या आधीच मंत्रिमंडळातील सेवा ज्येष्ठतेची यादी जाहीर करून दुसरे स्थान विधानपरिषदेतील सभागृह नेत्याला देण्यात आले आहे. त्यामुळे राणेंचा मंत्रिमंडळात समावेश झाला तरी चंद्रकांत पाटील यांचे दुसरे स्थान कायम रहाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“विधानपरिषदेच्या ६ जागा आम्ही जिंकूच,  पुण्याची जागा तर वनवे”, चंद्रकांत पाटलांचा विश्वास

News Desk

मराठा आरक्षणाच्या विषयात शरद पवारांनी का लक्ष दिले नाही? विनायक मेटेंचा सवाल

News Desk

शरद पवारांच्या आजच्या दिल्लीतील बैठकीवर संजय राऊत म्हणतात…

News Desk