HW News Marathi
महाराष्ट्र

दोनो रणजीत है,अटल अभी जीत है

मुंबई | आज (८ मे) भाजपची विधानपरिषदेच्या नावाची यादी जाहीर झाली आणि सोलापुरच्या मोहिते-पाटलांना विधानपरिषदेचं तिकीट मिळालं. लोकसभेच्या काळात भाजपमध्ये प्रवेश केलेले रणजितसिंह मोहिते -पाटील भाजपवासी झाले मात्र कोणतचं पद , उमेदवारी त्यांना वर्षभरात मिळाली नाही. तब्बल १ वर्षाने भाजपने त्यांना विधानपरिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी रणजितसिंह मोहिते-पाटलांचे अभिनंदन केले आहे. दोनो रणजीत है,अटल अभी जीत है असे म्हणतं त्यांनी रणजितसिंह मोहिते पाटलांना शुभेच्छा दिल्या आहेत.

रणजितसिंह निंबाळकर यांनी सुद्धा लोकसभेच्या काळात भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना माढा मतदारसंघाचं तिकीट मिळालं. राष्ट्रवादीचा गड निंबाळकरांनी काबीज केला. कृष्णा -भीमा स्थिरीकरण योजना, नीरा- देवघरचे पाणी सोलापूर आणि फलटणला आणण्यासाठी भाजप सरकारच्या काळात या दोन्ही रणजितनी मिळून प्रयत्न केले. आता भाजपमध्ये एक आमदार आणि एक खासदार रणजितसिंह जनतेसाठी काय काम करतात हे पाहावे लागेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कोविड टास्क फोर्ससोबत आज महत्त्वाची बैठक!

News Desk

नाथाभाऊंना राजकारण नीट समजतं –  देवेंद्र फडणवीस

News Desk

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना !

News Desk