मुंबई | रावसाहेब दादाराव दानवे यांचा जन्म १८ मार्च १९५५ रोजी, जालना जिल्ह्यातील जवखेडा (ता. भोकरदन) येथे शेतकरी कुंटुंबात झाला. वयाच्या २०व्या वर्षीच ते गावाच्या राजकारणात उतरले. दानवेंचा राजकीय जीवनातला प्रवेश त्यांच्या ग्रामपंचायतीपासून झाला. दानवे यांच्याकडे खास ग्रामीण ढंगात संवाद साधण्याची कौशल्य, संभाषण चातुर्य ही त्यांची खास वैशिष्ट्ये आहे.
दानवे यांनी १९८०मध्ये भोकरदन पंचायत समितीची सभापतिपदाची निवडणूक जिंकली. यानंतर १९८५ मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली. दानवे १९९० व १९९५मध्ये ते विधान परिषदेवर निवडून आले. नंतर १९९९, २००४ व २००९मध्ये भाजपच्या तिकिटावर ते लोकसभेवरही निवडून गेले. २०१४ मध्ये त्यांची मंत्रिजडळात वर्णी लागली होती. पण तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस मुंख्यमंत्री झाल्यावर दानेवेंना प्रदेशाध्यक्ष म्हणून पाठवण्यात आले. आता दानवे यांची पुन्हा एकदा मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.