HW News Marathi
Covid-19

बबड्याची सिरिअल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर..रोहित पवारांचा शेलारांना टोला !

मुंबई | अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा रद्द न करता त्या होणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.या परिक्षा रद्द व्हाव्यात यासाठी राज्य सरकारने कोर्टात धाव घेतली होती मात्र कोर्टाने राज्याला परिक्षा घेण्याच्या सुचना केल्या आहेत. परिक्षा व्हाव्यात अशी भूमिका असलेल्या भाजपने न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं. भाजप आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकाही केली . त्यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमची परिक्षेबाबतची भूमिका तुमच्यासारखी राजकीय नाही तर विद्यार्थ्यांच्या काळजीपोटीच होती आणि राहील. पण बबड्याची सिरिअल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर तुम्हालाही हे पटलं असतं, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

कोणालाही न जुमानता अंहकारातून विद्यार्थ्यांचे नुकसान केले, एका “बबड्याच्या” हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला, विद्यार्थ्यांना अखेर पर्यंत वेठीस धरले, शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला, आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण.. अहंकार…! ऐकतो कोण? मा. सर्वोच्च न्यायालयाने अखेर न्याय दिला!, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींची आज ‘मन की बात’, तर कोरोना आणि पाचव्या लॉकडाऊनसंदर्भात काय बोलणार ?

News Desk

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत एकाही व्यक्तीचा मृत्यू होऊ देणार नाही ! परळीत धनंजय मुंडेंचा संकल्प

News Desk

मोफत लसीकरणाच्या राज्याच्या निर्णयाचे स्वागत, मोहिम सुरुळीत पार पडावी !

News Desk