इंग्लंड। इंग्लंड दौऱ्यावर सामना खेळात असलेल्या भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची lateral flow test पॉजिटीव्ह आली आहे. या टेस्टचा रिजल्ट पॉजिटीव्ह आल्यानंतर रवी शास्त्री यांनी स्वतःला आयसोलेट केलं असून खबरदारीचा उपाय म्हणून बॉलिंग कोच भारत अरुण, फिल्डींग कोच आर.श्रीधर आणि फिजीओ थेरपिस्ट नितीन पटेल यांनाही विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे.
म इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधले चारही सदस्य संघासोबत मैदानात प्रवेश करणार नाहीयेत. या चारही सदस्यांच्या RTPCR टेस्ट झाल्या असून या टेस्टचा रिझल्ट येईपर्यंत त्यांना हॉटेलबाहेर येता येणार नाहीये अशी माहिती संघासोबतच्या असलेल्या मेडीकल टीमने दिली आहे.
BCCI Medical Team has isolated Head Coach Ravi Shastri, Bowling Coach B Arun, Fielding Coach R Sridhar, and Physiotherapist Nitin Patel as a precautionary measure after Shastri’s lateral flow test returned positive last evening: BCCI pic.twitter.com/48D4RQ4Pk8
— ANI (@ANI) September 5, 2021
या चार सदस्यांव्यतिरीक्त अन्य सदस्यांच्याही दोन Lateral Flow Test करण्यात आल्या आहेत. या सर्व सदस्यांच्या RTPCR चाचण्यांचे अहवाल निगेटीव्ह आल्यानंतरच त्यांना संघासोबत मैदानात प्रवेश मिळणार आहे.
दरम्यान, ओव्हल कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या भारतीय संघाने धडाकेबाज पुनरागमन केलं आहे. पहिल्या डावातील खराब कामगिरीला मागे टाकत भारताने कसोटी सामन्यावर पकड मजबूत बसवली आहे. सलामीवीर रोहित शर्माचं शतक आणि चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने तिसऱ्या दिवसाअखेरीस १७१ धावांची आघाडी घेतली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.