HW News Marathi
महाराष्ट्र

रविकांत तुपकरांसह शेतकऱ्यांनी केली दुधाने अंघोळ

बुलडाणा | दुधाचा दर हा पाण्याच्या बाटली पेक्षा कमी झाल्याने दूध उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळे दुधाला पाच रूपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी बुलडाण्यात आज (21 जुलै ) चक्क अंगावर दूध ओतुन घेतले. स्वतः ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी दुधाने अंघोळ करून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले.

यावेळी गायीच्या दुधासाठी पुढील 3 महिन्यांसाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिलिटर 5 रुपये अनुदान जमा करावे. केंद्र सरकारने 23 जूनला 10 हजार टन दूध पावडर आयात करण्याचा घेतलेला निर्णय त्वरित रद्द करावा. केंद्र सरकारने 30 हजार टन दूध पावडरचा बफर स्टॉक करावा व निर्यात अनुदान प्रतिकिलो 30 रुपये देण्यात यावे व दूध पावडर,तूप बटर व इतर दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटी पूर्णपणे रद्द करावा.या मागण्या करण्यात आल्या.

कार्यकर्त्यांनी हातात दुधाच्या कॅन घेउन रस्त्यावर उतरून प्रचंड घोषणाबाजी केली. त्यानंतर चक्क दुधाने आघोंळी केल्या. या अनोख्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर हिंदू स्मशानभूमी रस्त्याने राहणाऱ्या गरिबांना दूध वाटप करण्यात आले. या आंदोलनात राणा चंदन,शे.रफिक शे.करीम,आकाश माळोदे,दत्ता जेऊघाले,अमोल मोरे,निलेश राजपूत,गोपाल जोशी,हरी उंबरहंडे,अमोल बाहेकर यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी व ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कारचा अपघात, एकाचा जागीच मृत्यू

News Desk

भाजप-मनसे युतीचा नारळ फुटला, राज्यातील पहिली युती जाहीर!

News Desk

सदाभाऊ खोत यांच्या कार्यक्रमात ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी गोंधळ

News Desk