HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

राज्यातील ११ हजार कैद्यांची पॅरोलवर सुटका होणार, गृहमंत्र्यांचा निर्णय

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जवळपास ११ हजार कैद्यांची पॅरोलवर सुटका करण्यात येणार आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर या कैद्यांची तपासणी करुन त्यांची सुटका करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. किरकोळ आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे नसणाऱ्या कैद्यांचा यात समावेश आहे. पुढील आठवड्याभरात त्यानुसार कारवाई करण्याचे निर्देशही गृहमंत्र्यांनी दिले आहेत. देशातील ‘कोरोना’च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन जारी केला आहे. तासागणिक देशात आणि राज्यात कोरोनाग्रस्तांचा वाढत आकडा ही अत्यंत चिंतेची बाब ठरत आहे.

“राज्यात आज (२६ मार्च) कोरोनाच्या ३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून गुरूवार संध्याकाळपर्यंत राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२५ झाली आहे. मुंबई, सिंधुदुर्ग आणि नागपूर येथे प्रत्येकी १ नवा रुग्ण आढळून आला आहे”, अशी माहिती राजेश टोपेंनी दिली आहे. संपूर्ण देशात सध्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. राज्यात वाढत जाणाऱ्या याच आकड्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. ७ वर्ष किंवा त्याहून कमी शिक्षेस पात्र असलेल्या राज्यातील ६० तुरूंगांतील जवळ-जवळ ११,००० आरोपी / गुन्हेगारांना तातडीने पॅरोल देण्याचे आदेश दिल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

Related posts

भाजप आरपीआयला सत्तेवर आणा !

News Desk

पुलवामा हल्ल्याप्रकरणी केलेल्या वक्तव्यानंतर राज ठाकरेविरोधात गुन्हा नोंदविण्याची मागणी

News Desk

राज ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करणार, सूत्रांची माहिती

News Desk