HW News Marathi
Covid-19

मुंबईसाठी दिलासादायक बातमी ! नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा अधिक

मुंबई । राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि देशात मोठ्या प्रमाणात वाढणारा कोरोनाबाधितांचा आकडा चिंता वाढवणारा होता. मात्र, देशातील मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या मुंबईतून दिलासादायक बातमी समोर येत आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ७ हजार २२१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर याच एका दिवसात मुंबईत तब्बल ९ हजार ५४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचा जो दर आहे तो आता ८४ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५२ दिवसांवर आला आहे. मुंबईत सद्यस्थितीत ८१ हजार ५३८ कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबई महानगरपालिकेकडून याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईसारख्या राज्यतील महत्त्वाच्या शहरातील कोरोनामुक्तांचा आकडा वाढणे हे निश्चितच सद्यस्थितीत एक दिलासादायक बातमी आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज १२, ६०८ नव्या कोरोनाबाधितांची विक्रमी नोंद

News Desk

शासकीय कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन एकाच टप्प्यात

News Desk

पुण्यातील उद्याने बंद करा अशी महापौरांची आयुक्तांकडे पत्रातून मागणी

News Desk