मुंबई | भीमा कोरेगाव प्रकरणी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरुन पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तसेच भीमा-कोरेगाव प्रकरणातही या आरोपींचा संबंध असल्याचे महाराष्ट्र पोलिसांनी म्हटले आहे.
Bhima Koregaon case: Supreme Court extended the house arrest of five arrested activists till September 12. pic.twitter.com/T6HbOXvGCx
— ANI (@ANI) September 6, 2018
या हिंसाचार प्रकरणी संबंध असल्याच्या कारणावरुन वरवरा राव, अरुण पेरेरा, गौतम नवलखा, वेरनोन गोन्जाल्विस आणि सुधा भारद्वाज यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यानुसार १२ सप्टेंबरपर्यंत ५ आरोपींना नजरकैदैत ठेवण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या आरोपींवरील कारवाईला तुर्तास स्थगिती दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.