HW News Marathi
Covid-19

रेमडीसिव्हीर इंजेक्शन रुग्णालयातून गायब झाल्याने त्याच्या चौकशीची गृहराज्यमंत्री शंभूराज यांची मागणी

सातारा | साताऱ्यात १७५ रेमडीसिव्हीर इंजेक्शनपैकी काही इंजेक्शन जिल्हा रुग्णालयातून गायब झाली असल्याचे सांगत सातारा राष्ट्रवादीकडून या प्रकाराच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीने जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदनही दिले आहे. नव्याने रुजू झालेले जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी याबाबत माहिती घेत असल्याचे सांगितले आहे.
रेमडीसिव्हीर इंजेक्शन बाहेर मेडिकल स्टोअरमध्ये मिळत नाहीत, पण बाजारभावाने एका इंजेक्शनची किंमत पाच हजार रुपये आहे. मात्र २५ हजार रुपयांना ब्लॅकने विकली जातात. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले आहेत. या प्रकरणात जे दोषी सापडतील त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनावर मात केल्यावर अशोक चव्हाण यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

News Desk

कोरोना रोखण्यासाठी समन्वयाने काम करा,अजित पवारांचे पुण्यात निर्देश!

Arati More

भिडेंचं वक्तव्य म्हणजे ‘विनाश काले विपरीत बुद्धी’ ! अजित पवारांकडून कारवाईचा इशारा

News Desk