HW News Marathi
महाराष्ट्र

अशोक चव्हाणांना ‘त्या’ पदावरून हटवा !, विनायक मेटे आक्रमक

मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे राज्य सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मराठा समन्वय समितीच्या बैठकीनंतर विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. “सर्वोच्च न्यालयात मराठा आरक्षणावर सुनावणी सुरू असताना महाविकासआघाडी सरकारला गांभीर्य नाही. यातून, सरकार आणि उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचा नाकर्तेपणा दिसतो. आता मिळालेले आरक्षण जातंय की काय अशी शंका वाटते. या परिस्थिती अशोक चव्हाणांना पदावरून हटवावे. मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाणांकडून ती जबाबदारी काढून घ्यावी आणि एकनाथ शिंदे किंवा सक्षम मंत्र्याकडे उपसमितीचे अध्यक्षपद द्यावे”, अशी मागणी विनायक मेटे यांनी मराठा समन्वय समितीच्या बैठकीनंतर केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यालाही विरोध

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उद्या (९ ऑगस्ट) आयोजित नाशिक दौऱ्यालाही मराठा समन्वय समितीकडून तीव्र विरोध दर्शविण्यात आला आहे. “मराठा आरक्षणाबद्दल या सरकारच्या मनात पाप आलंय का? आम्ही या सरकारला जागं करण्यासाठी उद्या ९ ऑगस्ट रोजी आंदोलन करणार आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा देखील उद्या नाशिक दौरा आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याला आम्ही विरोध करणार आहोत”, असाही इशारा विनायक मेटेंनी यावेळी दिला आहे. दरम्यान विनायक मेटेंच्या नेतृत्वात राज्यातील ९ मराठा संघटना एकत्र येऊन मराठा समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. या मराठा समन्वय समितीची पुण्यामध्ये आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर विनायक मेटे बोलत होते.

…तर कोणत्याही मंत्र्याला आम्ही राज्यात फिरकू देणार नाही !

“आम्ही सरकारला आमच्या मागण्यांसंदर्भात निवेदन देऊ. मात्र, सरकारने जर काही सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन छेडू. कोणत्याही मंत्र्याला आम्ही राज्यात फिरकू देणार नाही. मराठा आरक्षणाला जोपर्यंत सर्कारक विश्वासात घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहील. काँग्रेस आणि आघाडीतील नेतेमंडळींना फक्त पदाची काळजी आहे. त्यांना समाजाचे प्रश्न महत्त्वाचे वाटत नाहीत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देखील ‘मातोश्री’तून डोळे झाकून बघत आहे. त्यांनी या विषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे”, असेही विनायक मेटे यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस महाराष्ट्रातचं,दिल्लीवारी नाही ! मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान नाही

Ruchita Chowdhary

अजित पवारांना जे काही मिळालंय ते शरद पवारांमुळेच ! । निलेश राणे

News Desk

गावी जाण्याची सोय होईपर्यंत विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याची सक्ती नाही

swarit