HW News Marathi
महाराष्ट्र

मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट न बघता आरक्षण द्यावे

मुंबई | भाजप सरकारने मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट न बघता मराठा समाजाला आरक्षण द्याला हवे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आज शिवसेनेने त्यांच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांसबोत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने तातडीने विधिमंडळाचे विशेष अविशेन बोलवावे. आणि सरकारने आरक्षणासाठी घटना दुरुस्तीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा असे उद्धव ठाकेर यांनी सांगितले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून शिवसेनेचे आमदार आज दुपारी ४ वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे देखील ठाकरे यांनी सांगितले.

Related posts

अनिल देशमुखांची ईडीविरोधात हायकोर्टात याचिका!

News Desk

महाराष्ट्र आणिबाणीच्या दिशेने ! अर्णबवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा भाजपकडून निषेध …

News Desk

‘कृपाशंकर सिंह भाजप मध्ये का आले?’ फडणवीसांनी सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगितलं!

News Desk