HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या जीवावर मिळालेल्या खासदारकीचा राजीनामा द्या,मग राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा ! रूपाली चाकणकर नवनित राणावंर भडकल्या !

पुणे | महाराष्ट्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.दुसरीकडे अंबानी स्फोटक प्रकरणात API सचिन वाझे अटकेत आहेत.या सगळ्या प्रकरणांवरून काल लोकसभेत भाजपच्या खासदारांनी गोंधळ घातला. परंतू या सगळ्यात खासदार नवनीत राणा यांनी आक्रमक भूमिका घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे, अशी मागणी केली.त्यांच्या याच मागणीवरून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी राणांना चांगलेच सुनावले आहे.

रूपाली चाकणकरांनी नवनित राणांना काय सुनावलं ?

रूपाली चाकणकर यांनी ट्विट केले आहे की , नवनीतजी राणा आपल्याला जर नैतिकतेचा एवढा पुळका आला असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा , कारण आज तुम्ही खासदार म्हणून जी भूमिका संसदेत मांडली आहे ती खासदारकी तुम्हाला राष्ट्रवादीच्या जीवावर मिळालेली आहे म्हणून मांडता आली आहे.

नवनित राणा काय म्हणाल्या होत्या ?

“जो व्यक्ती १६ वर्ष निलंबित होता, सात दिवस जेलमध्ये राहिला त्याला कोणत्या आधारे पुन्हा सेवेत घेतलं. जेव्हा भाजपाचं सरकार होतं तेव्हा उद्धव ठाकरेंनी सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेण्यास सांगितलं होतं. फडणवीसांनी यासाठी स्पष्ट नकार दिला होता. ज्यादिवशी ठाकरे सरकार आलं तेव्हा परमबीर सिंह यांना फोन करुन सर्वात आधी सचिन वाझेंना सेवेत घेतलं. सचिन वाझेंमुळे परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली,” असं नवनीत राणा यांनी सांगितलं आहे.“जर अशापद्दतीने खंडणी वसुल करण्याचं काम सुरु झालं तर संपूर्ण देशात असं होऊ शकतं. माझी विनंती आहे की, ज्याप्रकारे इतर आरोपांवर लागले आहेत, मला सांगायचं आहे की महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुनच हे सगळं सुरु आहे. बदल्या करणं, खंडणी वसुल करणं यामध्ये इतर कोणीही सहभागी नाही. एकट्या मुंबईतून महिन्याला १०० कोटी वसुली होत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातून किती होत असेल?”, अशी विचारणा नवनीत राणा यांनी यावेळी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनांचे बळकटीकरण करणार! – देवेंद्र फडणवीस

Aprna

आमच्या मध्यस्थिमुळेच सेना – कंगनातील वाद निवळला, आठवलेंचा दावा

News Desk

हुकूमशाही पध्दतीने मोदी सरकार प्रत्येक गोष्टीचा भाव वाढवतंय; राष्ट्रवादीच्या नेत्याचा आरोप

News Desk