HW News Marathi
महाराष्ट्र

हुकूमशाही पध्दतीने मोदी सरकार प्रत्येक गोष्टीचा भाव वाढवतंय; राष्ट्रवादीच्या नेत्याचा आरोप

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीपासून फळ-भाज्या, वस्तू अशा सर्वच जीवनावश्यक गोष्टी महागत चालल्या आहेत. काही केल्या महागाई संपत नाहीये. उलट पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती येताच महागाई आणखी वाढली असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे महागाईच्या मुद्यावरून विरोधक मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुद्धा वाढत्या महागाईवरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. सामान्य लोकांचा विचार न करता हुकूमशाही पध्दतीने मोदी सरकार प्रत्येक गोष्टीचा भाव वाढवत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस आणि खाद्य तेल तसेच अन्नधान्य यांचे दर गगनाला भिडले असतानाच सामान्य लोकांसाठी जीवनावश्यक असलेल्या ८०० औषधांच्या किमती एक एप्रिलपासून ११ टक्क्यांनी वाढवल्या आहेत, असेही महेश तपासे म्हणाले. दोन वर्षाच्या कोरोना काळात रोजगार नसल्याने लोकं हैराण झाले होते त्यातून सावरत असताना आता सर्वसामान्य जनतेचे महागाईने कंबरडे मोडले आहे. त्यामुळे हा सर्व बोझा सामान्य लोकांच्या डोक्यावर पडून आर्थिक गणिते बिघडवत आहे असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आज म्हणजेच शनिवारी ९ एप्रिल रोजी नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तसेच गेल्या ३ दिवसांपासून कंपन्यांनी दर वाढवलेले नाहीत. आजच्या आधी गुरुवार आणि शुक्रवारी म्हणजे ७ आणि ८ एप्रिल रोजी सुद्धा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले नव्हते. याआधी बुधवारी प्रति लिटर 80 पैशांची वाढ करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…आणि छगन भुजबळ, फडणवीस आले एकाच व्यासपीठावर एकत्र

News Desk

साहित्य संमेलन ही नाशिकचा लौकिक उंचावण्याची संधी! – छगन भुजबळ

News Desk

बाबरी मशीद खटल्याचा निकाल धक्कादायक असून वस्तुस्थितीला धरून नाहीः हुसेन दलवाई

News Desk