HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करण्याची महसूल मंत्र्यांची ग्वाही

डेगाव (जि. सांगली) : मुंबई येथे ९ आॅगस्टला निघणारा मराठा क्रांती मोर्चा शांततेने पार पडावा, यासाठी सरकारने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. मोठ्या संख्येने लोक मुंबईला जाणार आहेत. मराठा बांधवांसाठी मुंबई महापालिकेने सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे दिली. तसेच मराठा आरक्षणासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली.
यावर्षी पाऊस कमी झाल्याने टंचाई व दुष्काळी परिस्थिती ओढवण्याची भीती शेतकरी वर्गात आहे. मात्र शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, हे कर्जमाफीवरून जनतेच्या लक्षात आले आहे. अजूनही पावसाचे दिवस बाकी आहेत. त्या काळात चांगला पाऊस व्हावा, अशी अपेक्षा आहे. मागील वर्षी पाऊस चांगला झाला, त्यामुळे शेतीचे उत्पन्न ४० हजार कोटींनी वाढल्याचे पाटील यांनी सांगितले.

मेहता, देसार्इंची चौकशी

मंत्री प्रकाश मेहता व सुभाष देसाई यांच्यावरील आरोपांची चौकशी केली जाईल. त्यात ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुठलेही संकट आले तरी आम्ही एकत्र राहणार !

News Desk

सतत केंद्राकडे बोट दाखवण्याची सवय सोडा, कधी तरी आत्मचिंतन करा! 

News Desk

ॲट्रॉसिटी ॲक्टला कमकुवत करणाऱ्या परिपत्रकाची अंमलबजावणी होणार नाही! – सिद्धार्थ हत्तिअंबिरे

Aprna