HW News Marathi
महाराष्ट्र

कुठलेही संकट आले तरी आम्ही एकत्र राहणार !

मुंबई | “आम्ही तिघेही एकत्र आहोत, राहणार आणि कुठलेही संकट आले तरी आम्ही एकत्र राहणार,” असल्याचा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. पवार पुढे म्हणाले की, अजित पवारांनी घेतलेला निर्णया हा पक्षविरोधी असल्याची भूमिका पवार यांनी म्हटले आहे.

पवार पुढे म्हणाले की, सर्वसामान्य माणूस हा अजित पवार यांच्या भूमिकेसोबत नाही, असा दावा शरद पवार यांनी केला आहे. जे गेले आणि जे जाणारआहे त्यांच्यावर पक्षांतर्ग कारवाई करण्यात येणार असल्याचे पवारांनी संयुक्त पत्रकार परिषदे म्हणाले आहे. आम्ही तिघेही एकत्र आहोत, एकत्र राहणार आणि कुठलेही संकट आले तरी आम्ही एकत्र राहणार असल्याचा ठाम विश्वास पवारांनी व्यक्त केला आहे.

संयुक्त पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • अजित पवार फुटून जाती असे कधी वाटले नव्हते. – पवार
  • सुप्रिया सुळेंचे नाव मुख्यमंत्री पदासाठी कधीच नव्हाते – पवार
  • आता आम्ही एकत्र आलो आहोत. आता ही लढाई आम्ही एकत्रच लढणार । उद्धव ठाकरे
  • अजित पवारांबाबत निर्णय निश्चित घेतला जाईल। पवार
  • १०-११ सदस्य अजित पवारांसोबत आहेत- पवार
  • ‘रात्रीस खेळ चाले’सारखी सत्ता स्थापन केली
  • सकाळी-सकाळी बैठका घेऊन शिवरायांच्या महाराष्ट्रावर केंद्राकडून सर्जिकल स्ट्राईकची आखणी,सर्जिकल नाही फर्जिकल स्ट्राईक
  • आमच्यावर जनादेशाचा अनादर केल्याचा आरोप पण त्यांनी काय केले
  • तुम्हाला पद सोडायचे नसेल तर खुर्चीला फेविकोल लावून बसावे । उद्धव ठाकरे
  • कुठलेही संकट आले तरी एकत्रच राहणार
  • आम्ही 3 पक्ष मिळूनच सरकार बनवू
  • भाजपला बहुमत स्पष्ट करता येणार नाही
  • आम्ही ‘काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी’ तिन्ही पक्ष एकत्र आहोत. एकत्रच राहणार
  • त्याच याद्या राज्यपालांना सादर केल्या असतील
  • त्या याद्या अजित पवारांनी ताब्यात घेतल्या.
  • यादी करून आमदारांच्या सह्या घेऊन ठेवल्या होत्या.
  • पक्षांतरबंदी कायद्याची शरद पवारांकडून आठवण
  • सकाळी 7 वाजता धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर या, असा निरोप आम्हाला होता । राजेंद्र शिंगणे
  • आम्हाला राजभवनात नेले पण का नेले माहीत नव्हते । राजेंद्र शिंगणे
  • राजेंद्र शिंगणे शपथविधीनंतर थेट माझ्या घरी
  • जनमानसाविरोधी जे कोणी त्यांच्यासोबत गेले असतील त्यांच्यावर पक्षाची कारवाई होईल
  • १० ते ११ जण अजित पवारांसोबत होते
  • सर्वसामान्य माणूस अजित पवारांसोबत नाही
  • अजित पवारांचा निर्णय पक्षविरोधी
  • महाराष्ट्रातील जनमानस भाजपसोबत सरकार बनविण्याच्या विरोधी
  • जो प्रामाणिक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे तो भाजपसोबत सरकार बनविण्यासाठी जाणार नाही

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांची त्या पत्रावरून शरद पवारांनी पंतप्रधानांकडे केली तक्रार

News Desk

अखेर अभिनेत्री दिपाली सय्यदचे उपोषण मागे …

Arati More

‘आगे आगे देखो होता है क्या?’, भूजबळांच्या मुक्ततेवर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया

News Desk