HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादी आमदाराच्या वडिलांना ‘कृषीरत्न पुरस्कार’ जाहीर, मुलाने ‘असं’ केलं अभिनंदन

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या वडिलांना २०१९ चा डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. यासंदर्भात त्यांचे पुत्र रोहित पवार यांनी ट्विटरवरुन ही माहिती देत आपल्या वडिलांचे अभिनंदनही आमदार लेकानं केलं आहे. दरम्यान, राजेंद्र पवार यांनी बारामती अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून जागितक पातळीवरील प्रयोगशील शेतीबारामतीत केली आहे.

”कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणारा ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार – २०१९’ बाबांना जाहीर झाला. या सन्मानाबद्दल बाबांचं आणि इतरही वेगवेगळे पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांचं मनःपूर्वक अभिनंदन!’, असे रोहित यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. रोहीत यांनी वडिलाचे शेतातील आणि शेतीसंबधित जोडधंद्यातील कामाचे फोटोही शेअर केले आहेत. तसेच कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ समाजाच्या हितासाठी सदैव काम करत असताना त्याची दखल अशा पुरस्काराच्या माध्यमातून घेतली जाते, तेंव्हा अधिक आनंद वाटतो. पुरस्कार जाहीर झालेले सर्व सन्माननीय भविष्यातही कृषी आणि संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय काम करतील, असा विश्वासही व्यक्त केला आहे.

कोण आहेत राजेंद्र पवार?

बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन असलेले राजेंद्र पवार हे आमदार रोहीत पवार यांचे वडिल आहेत. बारामती अॅग्रोच्या माध्यमातून त्यांनी कृषी क्षेत्रात नव-नवीन प्रयोग केले आहेत. त्यांच्या, कृषीक्षेत्रातील योगदानाची दखल घेऊनच राज्य सरकारच्यावतीने दिला जाणारा कृषीरत्न पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. यापूर्वीच्या सरकारमधील कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनीही बारामती अॅग्रोला भेट दिल्यानंतर राजेंद्र पवार आणि बारामीत अॅग्रोचं मोठं कौतुक केलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिवाळी अधिवेशनच्या कालावधीवरून फडणवीस नाराज; म्हणाले… सरकारला रस नाही!

News Desk

12 आमदारांबाबत शब्द खर्च करणार नाही, शरद पवारांचा थेट राज्यपालांना इशारा!

News Desk

आघाडीचे भवितव्य जनतेने एकदा दाखवून दिले आता बिलोलीतही दिसेल- अतुल भातखळकर

News Desk