मुंबई। राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कर्जत जामखेडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भ्रष्ट मार्गाचा वापर करत विजयी झाल्याचा आरोप माजी मंत्री आणि भाजप नेते राम यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदेंनी न्यालयात धावा घेत रोहित पवार विरोधात याचिका दाखल केली आहे. यानंतर न्यायालयाने रोहित पवार यांनी समन्स बजावत त्यांना बाजू मांडण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, मला कोणत्याही प्रकारचे समन्स आलेले नसल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
कर्जत जामखेडमध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना प्रभावित केल्याचा आरोप याचिकेतून राम शिंदे यांनी रोहित पवारांवर केला आहे. या याचिकेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावाचा देखील उल्लेख असल्याची माहिती मिळाली आहे. यावर रोहित पवार एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, “मी प्रामाणिकपणे निवडणुक लढवली आहे. निवडणुकीत माझा विजय झाला तो लोकांचा निर्णय होता. मात्र, तरीदेखील भाजपचे पराभूत झालेले उमेदवार राम शिंदे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली,” असे रोहित पवार यांनी सांगितले.
रोहित पवार पुढे म्हणाले की, “राम शिंदे यांना न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, तसाच आमचाही विश्वास असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मला न्यायालयाकडून आतापर्यत कोणत्याही प्रकारचे समन्स आले नसून राम शिंदे कोणत्याबाबात न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि त्यांनी न्यायालयात कोणते मुद्दे मांडले आहे. आणि न्यायालयाकडून कोणत्याविषयी नोटीस आल्याचे समजले नाही,” असे ते म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.