HW News Marathi
महाराष्ट्र

माणूस खोटा असता तर व्यक्त झाला नसता, रोहित पवारांचे मुंडेंना समर्थन  

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज (१५ जानेवारी) बारामती येथील पिंपळी लिमटेक येथे मतदान केले. आज ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतजान सुरु आहे. मतदानानंतर त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गायिका रेणू शर्मा यांनी केलेल्या आरोपांवर रोहित पवार यांनी भूमिका मांडली. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले हा व्यक्तीगत विषय आहे. पोलीस याबद्दल तपास करत आहेत. पोलिसांचा तपास पूर्ण होईपर्यंत काही बोलता येणार नाही. मात्र, हा काही प्रमाणात हा बदनामीचा आणि ब्लॅकमेलिंगचा प्रकार असल्याचे पुढे येतय, असं रोहित पवार म्हणाले. धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सत्य परिस्थिती मांडली.

गायिका रेणू शर्मा यांनी केलेल्या आरोपांबद्दल पोलीस तपास करत आहेत. तपास होईपर्यंत काही बोलता येणार नाही. मात्र, काही प्रमाणात हा बदनामीचा आणि ब्लॅकमेलींगचा प्रकार असल्याचे पुढे येतय.शेवटी पोलीस तपासात सर्व गोष्टी पुढे आल्यानंतर याबद्दल पक्ष आणि स्वत: धनंजय मुंडे याबद्दल निर्णय घेतील. धनंजय मुंडे यांनी स्वत: याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सत्य परिस्थिती त्यांनी लोकांसमोर मांडली. माणूस खोटा असता तर व्यक्त झाला नसता, अशा व्यक्तीविरोधात षडयंत्र होत असेल तर त्याबद्दल खोलात जाण्याची गरज आहे, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘देशमुखांचं उठसूठ समर्थन करणाऱ्या ठाकरे सरकारचंही ‘तोंड’ काळं’, भाजपचा घणाघात..!

News Desk

‘मी पाच वर्षे जिल्हाधिकारी म्हणून काम केलं’, अजित पवार चुकून चुकले!

News Desk

जनगणना केल्यावरच ओबीसींना न्याय मिळेल, विजय वडेट्टीवारांनी केल्या ‘या’ तीन मागण्या

News Desk