HW News Marathi
महाराष्ट्र

पवारांबद्दलचं चंद्रकांत पाटलांचं ते वक्तव्य ऐकून मित्राचीच आठवण झाली – रोहित पवार

मुंबई | राज्याच्या राजकारणात शाब्दिक चकमकी सुरूच आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा नवा राजकीय उभा राहिला आहे. पवारांविषयी केलेल्या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका होत असून, आमदार रोहित पवार यांनीही पाटलांना टोला लगावला आहे.

“सचिनकडून एखादा बॉल सुटला, तर पोटावरील पॅकेटमधून एकेक पॉपकॉर्न खात घरात पाय पसरुन tvवर मॅच पाहणारा मित्र ओरडायचा… “अर्रर्रर्र सचिनला खेळताच येत नाही…” पवार साहेबांबाबत चंद्रकांत पाटील यांनी केलेलं वक्तव्य ऐकून त्या मित्राचीच आठवण झाली आणि खूप हसूही आलं,” अशा शेलक्या शब्दात रोहित पवारांनी पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

“राजकारणात येण्यापूर्वी मला पवार मोठे नेते वाटायचे, मात्र राजकारणात आल्यावर कळाले ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो,” असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना केलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना नेते रवींद्र वायकरांची भाजपा नेते किरीट सोमय्यांना मानहानीची नोटीस

News Desk

एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही!

News Desk

वानखेडेंच्या प्रायव्हेट आर्मीकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न, नवाब मलिकांचा पुन्हा पलटवार

News Desk