HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

शांत राहूनही चांगले काम करता येते, त्यासाठी घसा फोडण्याची गरज नसते

मुंबई | महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण असल्याकारणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवेळी कठोर पावले उचलत आहेत. त्यांच्या या नेतृत्वाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते रोहित पवार यांनी कौतुक केले आहे. तसेच, मुख्यमंत्री करत असलेल्या कामगिरीवर विरोधकांकडून ताशेरे ओढले जात आहेत त्यांना प्रत्युत्तरही रोहित पवार यांनी दिले आहे. भूमिका घेत नसल्याचं काही लोक म्हणतात पण काम करताना किंचाळण्याची गरज नसते. शांतपणे परिस्थिती कंट्रोल करता येत असेल & त्यांना महाविकास आघाडीचे नेतेही खंबीर साथ देत असतील तर उगाच घसा फोडण्यापेक्षा शांत राहून कामाचा ठसा उमटलेला कधीही चांगला, असे ट्विट करत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

कोरोना साथीच्या संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सरकार झोकून देऊन काम करत आहे. देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर होण्याआधीच महाराष्ट्रात संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. कोरोनाशी दोन हात करताना त्यात कोणतीही तडजोड करायची नाही, अशी ठाम भूमिका राज्य सरकारने घेतलेली आहे. त्याचवेळी संचारबंदीच्या काळात लोकांना जीवनावश्यक वस्तूंची कोणतीही कमतरता भासू नये म्हणून ही दुकाने २४ तास सुरू ठेवण्याचा आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. इतके करुनही ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कडक भूमिका घेत नसल्याचे काही लोक म्हणतात पण काम करताना किंचाळण्याची गरज नसते’, अशा शब्दांत रोहित यांनी कुणाचेही नाव न घेता टोला लगावला.

Related posts

ताडदेव परिसरातील झोपडीला आग

News Desk

दिवाळीच्या सुट्टीत वाढ, १४ दिवस असणार सुट्टी – वर्षा गायकवाड

News Desk

मराठा आरक्षण कोर्टात टिकू दे म्हणता म्हणजे शंकेची पाल चुकचुकतेच !

News Desk