मुंबई | गेले अनेक दिवस भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या येत होत्याच. त्यानंतर भाजपला रामराम करत ते राष्ट्रवादीची वाट धरणार अशा चर्चांणा देखील उधाण आले होते. मात्र, अखेर भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे. २३ ऑक्टोबरला म्हणजेच शुक्रवारी ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यावरुन भाजपकडून नाराजी व्यक्त केली जात असली तरी त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारकडून त्यांचे स्वागत केले जात आहे.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत खडसेंचे स्वागत केले आहे. “राष्ट्रवादीला ओहोटी लागली अशा बातम्या वर्षभरापुर्वी येत होत्या. पण निसर्गाचाच नियम आहे. ओहोटी संपल्यानंतर भरती सुरु होते. वेलकम एकनाथ खडसे साहेब”, असे ट्विट रोहित पवारांनी केले आहे. त्यामुळे भाजप नेते आता काय पुढे बोलणार यावर नक्कीच सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला ओहोटी लागली', अशा बातम्या वर्षभरापूर्वी येत होत्या. पण निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरु होते.
WelCome
एकनाथ खडसे साहेब!@EknathGKhadse pic.twitter.com/IYjsVQ8ZMy
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 21, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.