HW News Marathi
देश / विदेश

सरसंघचालकांनी घेतली मिथुन चक्रवर्तींची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज (१६ फेब्रुवारी) सकाळी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली आहे. मोहन भागवत यांनी मिथुन चक्रवर्ती यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन ही भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरसंघाचक आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यात ही बैठक झाली का ?मिथुन चक्रवर्ती हे मूळचे बंगाली अभिनेता त्यांची लोकप्रियता मोठी आहे.

मिथुन चक्रवर्ती यांनी स्वतः या भेटीबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी स्पष्टीकरण देताना मिथुन म्हणाले की, “मोहन भागवतांबरोबर मी अध्यात्मिक अंगाने जोडलो आहे. लखनऊमध्ये मी त्यांना भेटलो होतो. त्यानंतर मी त्यांना मुंबईत आल्यानंतर एकदा माझ्या घरी भेट द्या, अशी विनंती केली होती.” दरम्यान, यावेळी मिथुन यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असलयाचे वृत्त फेटाळून लावले आहे. राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या चर्चांबाबत बोलताना मिथुन चक्रवर्ती म्हणाले कि, “तुम्ही असे कोणतेही अंदाज लावू नका. तसे काही घडलेले नाही.”

मिथुन चक्रवर्ती हे यापूर्वी राज्यसभेत खासदार होते. त्यानंतर, ते बराच काळ तृणमुल काँग्रेसमध्येही होते. मात्र, २०१६ साली मिथुन यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपला राजीनामा दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पत्रकार हत्येप्रकरणी राम रहीमला जन्मठेप

News Desk

सीबीएसई बोर्डाचा १२ वीचा निकाल जाहीर, ८८.७८ % विद्यार्थी उत्तीर्ण

News Desk

मैत्रिणीवर बलात्कार करून व्हिडीओ टाकला पॉर्न साइटवर

News Desk