HW News Marathi
महाराष्ट्र

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणासाठी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे पुण्यात दाखल 

पुणे | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यात मोठा वादंग निर्माण झाला आहे. याच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड हे चांगलेच अडचणीत सापडले असून संजय राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, एकीकडे हे वृत्त येत असताना दुसरीकडे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे पुण्यात दाखल झाले असून पूजा चव्हाण ते या आत्महत्या प्रकरणाची माहिती घेणार असल्याचे वृत्त येत आहेत.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अडचणीत सापडलेल्या मंत्री संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवल्याचे वृत्त काहीच वेळापूर्वी समोर येत होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारणार की नाकारणार ? याकडेही संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, राज्यात जरी सध्या संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा होत असली तरीही कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्हाला वाटलं २५ वर्ष आम्ही राहू पण खाडकन आपटलोच ना!

News Desk

पेट्रोल दरवाढीवर कॉंग्रेसचं पुण्यात आंदोलन, थेट पेट्रोल पंपावर नेली घोडागाडी

News Desk

शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी घेतली बाळासाहेब थोरात भेट, मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वीच नाराजी दूर ?

News Desk